agriculture news in Marathi, agrowon, HT Seed Process SIT Report at the end of March | Agrowon

'एचटी' बियाणे प्रकरणी 'एसआयटी' अहवाल मार्चअखेर
विनोद इंगोले
बुधवार, 21 मार्च 2018

नागपूर : हर्बिसाइड टॉलरंट सीडची पाळेमुळे खोदण्यासाठी सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार येत्या २८ ते २९ मार्चपर्यंत एसआयटी आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

नागपूर : हर्बिसाइड टॉलरंट सीडची पाळेमुळे खोदण्यासाठी सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार येत्या २८ ते २९ मार्चपर्यंत एसआयटी आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

बीजी-२ या वाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव त्यानंतर त्यावर नियंत्रणासाठी फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना झालेली विषबाधा यामुळे सरकारची झोप उडाली होती. सरकारकडून विषबाधाप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआयटीकडून अहवाल मिळाल्यानंतर त्यातील निष्कर्षाच्या आधारे काही उपाययोजनांवर सध्या केंद्र व राज्य सरकार दोघेही काम करीत आहेत. याच घडामोडीत एचटी सीडची खेप अवैधरीत्या अनेक जिल्ह्यांत पोचल्याचे आणि या अनधिकृत बियाण्यांची मोठ्या क्षेत्रावर लागवड झाल्याचा खुलासा झाला. 

या नव्या खुलाशामुळे सरकारचे डोळे पुन्हा विस्फारले. एचटी सीडला परवानगी मिळाली नसतानाही अशाप्रकारे सर्वदूर हे बियाणे पोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या वर्षी ५ ते ७ लाख पाकिटांची विक्री चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत झाल्याचे सूत्र सांगतात.

त्याची दखल घेत कृषी विभागाचे अवर मुख्य सचिव (कृषी) विजयकुमार हे एचटी सीडचा प्रसार करणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विजयकुमार यांनी स्वतः नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत येत यामागील बारकावे जाणून घेतले. आता एसआयटीचा याविषयीचा अहवाल आल्यानंतर केंद्र व राज्य सरकार दोघेही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

'एसआयटी'चा अहवाल
विजयकुमार यांच्या आग्रहाने याविषयी एसआयटी स्थापन करण्यात आली. राज्य गुप्त शाखेचे बर्वे अध्यक्ष, तर अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे सचिव होते. बर्वे यांनी नकार दिल्यानंतर या समितीची पुनर्रचना करण्यात आली. आता या समितीत कृष्णप्रकाश यांच्यासह सुभाष नागरे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे तज्ज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालकांसह १० ते ११ जणांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत या एसआयटीचे कार्यालय आहे. दिल्लीतील काही सदस्यांचा समावेश त्यासोबतच एचटी सीडचे आंतरराज्यीय कनेक्‍शन असल्याने दिल्लीतही काही बैठका या संदर्भाने पार पडल्या. बीजोत्पादन नजीकच्या काही राज्यांमध्ये करण्यात आल्याचे सूत्र सांगतात. समितीचा हा अहवाल आता अंतिम टप्प्यात असून, २८ ते २९ मार्च दरम्यान तो सरकारला सादर होणार असल्याचे सांगितले जाते.

इतर ताज्या घडामोडी
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...