agriculture news in Marathi, agrowon, Impotent Rates UP by 25 to 30 rupees | Agrowon

बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांनी वाढ
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

सांगली  ः यंदा बेदाण्याच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदाचा हंगाम १५ मेपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या तीन वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात बेदाण्याच्या दरात २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. बेदाण्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्‍यता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच पिवळ्या बेदाण्याबरोबरच काळ्या बेदाण्यालाही परदेशात मागणी वाढल्याने विक्रमी निर्यात झाली आहे.

सांगली  ः यंदा बेदाण्याच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदाचा हंगाम १५ मेपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या तीन वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात बेदाण्याच्या दरात २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. बेदाण्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्‍यता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच पिवळ्या बेदाण्याबरोबरच काळ्या बेदाण्यालाही परदेशात मागणी वाढल्याने विक्रमी निर्यात झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात बेदाण्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत बेदाण्याला अपेक्षित दर मिळाला नसल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा मात्र हिरव्या, पिवळ्या बेदाण्यास चांगला दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशातही बेदाण्यास चांगली मागणी आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

आखाती देशात इराणमधून येणाऱ्या बेदाण्याची आवक घटली असल्याची माहिती तासगाव बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. याचा फायदा राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. राज्यातील बेदाण्याचे उत्पादन पाहता दरवर्षी सुमारे १० हजार टन उत्पादन वाढते किंवा घटले जाते असे चित्र पहावयास मिळते आहे. मात्र सन २०१६-१७ मध्ये १ लाख ८० हजार टन इतक्‍या बेदाण्याचे उत्पादन झाले होते. परंतु गतवर्षी बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे २० हजार टनाने उत्पादन कमी झाले.

बेदाण्याचे उत्पादन जरी कमी झाले असले तरी, नोटाबंदी आणि त्यानंतर बेदाण्यावर लागू करण्यात आलेला जीएसटी कर प्रमाणालीमुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. बेदाण्याच्या चालू हंगामात बेदाण्याच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घटीची शक्‍यता आहे. दरम्यानच्या काळात बेदाण्याची परदेशासह देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढली आहे. यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली असून पुढील काळात बेदाण्याच्या दरात वाढ निश्‍चित असल्याचे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

बेदाण्याचा तुलनामत्क दर आढावा

गतवर्षीचा दर (प्रतिकिलो)
 

हिरवा बेदाणा १०० ते १६०
 
पिवळा बेदाणा १०० ते १४०
 
काळा बेदाणा ३५ ते ६५
 

चालू वर्षातील दर (प्रतिकिलो)
 

हिरवा बेदाणा १३५ ते २०५
 
पिवळा बेदाणा १५० ते १९०
काळा बेदाणा ५५ ते ९०
 

 

राज्यातील बेदाण्याचे उत्पादन

वर्ष बेदाणा उत्पादन (टन)
 
२०१३-१४ १ लाख ३० हजार
 
२०१४-१५ १ लाख ८० हजार
 
२०१५-१६ १ लाख ७० हजार
 
२०१६-१७ १ लाख ८० हजार
 
२०१७-१८ १ लाख ६० हजार

 

 

 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...