agriculture news in marathi, agrowon, Inauguration of 'grape-pomegranate' exhibition | Agrowon

‘द्राक्ष-डाळिंब' प्रदर्शनाचे दिमाखात उद्‌घाटन

सुदर्शन सुतार
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

सोलापूर : ‘सकाळ-ॲग्रोवन’ आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आज (शुक्रवारी) दिमाखात शेतकऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सोलापूर : ‘सकाळ-ॲग्रोवन’ आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आज (शुक्रवारी) दिमाखात शेतकऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेतीतील विविध कृषी अवजारे, खते, बियाणांच्या माहितीसह नव्या तंत्रज्ञानाचा अाविष्कार पाहण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. सोलापुरातील होम मैदानावर सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रगतशील द्राक्ष बागायतदार दत्ता काळे (नान्नज, ता. उत्तर सोलापूर), परमेश्‍वर सूळ (कोथाळे, ता. मोहोळ), हणमंत माने (महागाव, ता. बार्शी), मल्लाप्पा जंगलगी (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर), चन्नप्पा ऐवळे (पानमंगरुळ, ता. अक्कलकोट), नष्टे ए. एस. (नेवरे, ता. माळशिरस) या शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.

या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. विजय अमृतसागर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एल. आर. तांबडे, अँडसलाइटचे राज्याचे मुख्य वितरक प्रकाश शिंदे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे या वेळी उपस्थित होते.

उद्‌घाटनावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांनी ‘ॲग्रोवन’च्या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हास्तरावर अशा प्रदर्शनांची गरज आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनातील नव्या तंत्रज्ञानाची, मान्यरांच्या तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी केले.

ट्रॅक्‍टर, ब्लोअर, ड्रीप इरिगेशन, कीडनाशके, वनस्पती वाढनियंत्रके यांच्यासह विविध कृषी उत्पादने, वस्तू आदींचा समावेश असणारे हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (ता.१७) चालणार आहे.

पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता होते; पण तत्पूर्वीच शेतकऱ्यांनी प्रदर्शनस्थळी गर्दी केली होती. प्रत्येक स्टॉलवर शेतकरी माहितीपत्रक घेण्यासह त्यांना असलेल्या शंका विचारत होते. शेतकरी ते उत्पादक कंपन्यांशी थेट संवाद होत होता. शेतकऱ्यांबरोबर अनेक शेतकरी पती-पत्नींचाही सहभाग यामध्ये होता. पहिल्या दिवशी प्रगतशील शेतकरी मारुती चव्हाण यांचे ‘द्राक्ष उत्पादनासाठी ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान झाले; तर दुपारच्या सत्रात डाळिंबावर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांचे ‘डाळिंबावरील कीड-रोग समस्या’ यावर मार्गदर्शन झाले.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...