agriculture news in Marathi, agrowon, The intense heat shock of open poultry | Agrowon

खुल्या कुक्कुटपालनाला उन्हाच्या तीव्रतेचा फटका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा फटका खुल्या गावरान कोंबडीपालनाला बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेने कोंबड्या दगावू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये तीनशेवर कोंबड्या दगावल्या आहेत. मानमोडी (राणीखेत डिसीज) रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता असलेल्या तालुक्‍यात हे प्रमाण अधिक आहे. 

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा फटका खुल्या गावरान कोंबडीपालनाला बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेने कोंबड्या दगावू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये तीनशेवर कोंबड्या दगावल्या आहेत. मानमोडी (राणीखेत डिसीज) रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता असलेल्या तालुक्‍यात हे प्रमाण अधिक आहे. 

नगर जिल्ह्यात कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्यांनी आपापले शेड उभारले आहेत. त्याचे व्यवस्थापन करताना त्यातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणाही बसवलेली असते. असे असले तरी खुले गावरान कोंबडीपालनही मोठ्या प्रमाणात केले जाते. गावरान कोंबडीला मागणीही अधिक असते. बहुतांश कुटुंबे आपल्या कौटुंबिक खर्चाला हातभार लागावा यासाठी आपल्या परस दारात, शेतात, घराच्या अंगणात मोठ्या प्रमाणात गावरान कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यातून मिळणाऱ्या अंडी, मांस यापासून कुटुंबाचा घरखर्च भागवता येतो. 

यंदा खुल्या गावरान कोंबडी पालनाला मात्र तीव्र उष्णतेचा फटका बसत आहे. या वर्षी जिल्हाभरात तापमान ४२ अंशांच्या पुढे जात आहे. खुल्या कोंबडी पालनात तापमान नियंत्रणाची सुविधा नसते. त्यामुळे उन्हाचा फटका गावरान कोंबड्यांना बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरात आतापर्यंत केवळ उन्हाची तीव्रता सहन न झाल्याने जवळपास तीनशेवर कोंबड्या मरण पावल्या आहेत. काही भागात मानमोडीसारख्या रोगाचाही फैलाव होत आहे. त्याच्या परिणामामुळे कोंबड्या व त्यांची पिले दगावत आहेत. त्यामुळे यंदा उन्हाचा गंभीर परिणाम खुल्या कुक्कुटपालनावर होताना दिसत आहे. 

उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना मानमोडी रोगाचा प्रादुर्भाव होतो. मानमोडी हा कोंबड्यांना होणारा रोग हवेच्या माध्यमातून जलद गतीने फैलावतो. या वर्षी तापमानात वाढ झाल्याने गावरान कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्याजवळील पशू आरोग्य केंद्रातून या कोंबड्यांना आर. डी. व लासोटा या लसी टोचून घ्याव्यात. कोंबड्यांची राहण्याची जागा, खुराडी रोज स्वच्छ करावीत.
- डॉ. वसंत गारुडकर, 
पशुवैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी, नगर  

लासोटा बूस्टर लसीकरण करणे गरजे आहे. वातावरण बदल, पक्ष्यांना इलेक्‍ट्रोलाइट पावडर व व्हिटॅमीन सी पाण्यातून दिले पाहिजे. चार वेळा थंड पाणी पाजणे आणि ते पिण्याचे पाणी सतत बदलणे गरजेचे आहे. शिवाय कोंबड्या थांबवण्यासाठी थंडावा देणारी सावलीही असणे महत्त्वाचे आहे.
- संतोष कानडे, 
गावरान कोंबडीचे अभ्यासक, नगर

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...