agriculture news in Marathi, agrowon, In the Jalgaon Market Committee, the onion yield of onions is 1000 quintals | Agrowon

जळगाव बाजार समितीत कांद्याची आवक १००० क्विंटलवर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यात कांद्याची आवक वाढली असून, दरांवर दबाव आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बुधवारी (ता. ११) धुळे बाजार समितीत सुमारे ९०० क्विंटल तर जळगाव बाजार समितीमध्ये १००० क्विंटल एवढी आवक झाली. 

जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यात कांद्याची आवक वाढली असून, दरांवर दबाव आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बुधवारी (ता. ११) धुळे बाजार समितीत सुमारे ९०० क्विंटल तर जळगाव बाजार समितीमध्ये १००० क्विंटल एवढी आवक झाली. 

कांद्याची आवक वाढतच असून, कांदा साठवणुकीची चांगली व्यवस्था ग्रामीण भागात नसल्याने काढणीनंतर कांदा विक्रीशिवाय पर्याय नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांदा चाळी १०० टक्के शेतकऱ्यांकडे किंवा कांदा उत्पादकांकडे नाहीत. दोन-चार गावांमध्ये दोन-तीन शेतकऱ्यांनाच कांदाचाळीचा लाभ मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा) येथील उपबाजार समितीमध्येही कांद्याची अधिक आवक होत आहे. अडावद बाजारात प्रतिदिन ८०० क्विंटलवर आवक होत असून, ती पुढे आणखी वाढू शकते. 

जळगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान ३०० व कमाल ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर बुधवारी होता. तर चाळीसगाव, धुळे, अडावद, शिरपूर येथील बाजार समितीमध्येही कमाल दर ६०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक नाहीत. शिरपूर, चोपडा, रावेर भागातील शेतकऱ्यांना इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजार मुंबईच्या तुलनेत जवळ आहे. परंतु इंदूरलाही लाल कांद्याचा कमाल दर ८०० रुपये प्रतिक्विंटलवर नाही. त्यामुळे शेतकरी कांद्याची स्थानिक बाजारातच विक्री करीत आहेत.

यंदा खानदेशात कांद्याची बऱ्यापैकी लागवड झाली होती. धुळे जिल्ह्यातील कापडणे, न्याहळोद, लामकानी, कुसुंबे आदी भागासह शिरपुरातील अर्थे, तऱ्हाडी भागातही चांगली लागवड झाली होती. चोपडा तालुक्‍यातील अडावद, लोणी, पंचक भागात मोठी कांदा लागवड यंदा होती. तर यावलमधील किनगाव, डांभुर्णी, एरंडोलातील कासोदा, आडगाव, उत्राण आदी भागातही कांदा लागवड बऱ्यापैकी झाली होती. चाळीसगाव तालुक्‍यातील पिलखोड व गिरणा काठावर कांदा लागवड अधिक झाली.

कापसाचे पीक काढून कांद्याची लागवड झाली. परंतु कांद्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. साक्री (जि. धुळे) तालुक्‍यातील पिंपळनेर बाजार समितीमध्येकी अधिक आवक आहे. कांद्याला दर मात्र अपेक्षित नसल्याने शेतकरी अधिक दरांसाठी १५ ते २० दिवसांच्या उधारीवर कांदा विक्री करू लागले आहेत. 

इतर बातम्या
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...