agriculture news in marathi, Agrowon, in Jalgaon papaya occures bacterial disease | Agrowon

जळगावात पपईवर विषाणूजन्य रोग

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यातील पपई बागांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. हा ‘रिंगस्पॉट व्हायरस’ रोग असल्याचे शेतकरी सांगतात. चोपडा, जळगाव, यावलमधील पपईच्या बागा या रोगाने बाधित झाल्या आहेत. ऑगस्टमध्येच रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे झाडांची अपेक्षित वाढ झाली नाही. मार्च ते एप्रिल यादरम्यान लागवड केलेल्या पपईच्या बागांमध्ये विषाणूजन्य रोग दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव : जिल्ह्यातील पपई बागांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. हा ‘रिंगस्पॉट व्हायरस’ रोग असल्याचे शेतकरी सांगतात. चोपडा, जळगाव, यावलमधील पपईच्या बागा या रोगाने बाधित झाल्या आहेत. ऑगस्टमध्येच रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे झाडांची अपेक्षित वाढ झाली नाही. मार्च ते एप्रिल यादरम्यान लागवड केलेल्या पपईच्या बागांमध्ये विषाणूजन्य रोग दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.

यामुळे झाडांवरील फळे निकोपपणे तयार होण्याची प्रक्रिया मंदावली असून, फळांचा आकार बेढब होऊ लागला आहे. रोगाला थोपविण्यासाठी शेतकरी उपाययोजना करीत आहेत. फवारण्या सातत्याने घ्याव्या लागत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे.

ऑगस्टमध्ये रिंगस्पॉटने नुकसान
ऑगस्टमध्ये ‘रिंगस्पॉट व्हायरस’ हा विषाणूजन्य रोग फोफावला. त्यात फूलगळ झाली. झाडांचा रंग पिवळा, फिकट हिरवा झाला. फुले हवी तशी न लागल्याने आपसुकच त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच झाडांच्या वाढीवर परिणाम झाला, असे सनपुले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील पपई उत्पादक शेतकरी किरण पाटील यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात अडीच हजार हेक्‍टरवर क्षेत्र
जिल्ह्यात अडीच हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड झाली आहे. मार्च व एप्रिलमध्ये पपईची लागवड अधिक केली जाते. या पपईमधून फळे तयार होऊन त्यांची काढणी ऑक्‍टोबरच्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित होते, परंतु आता विषाणूजन्य रोगामुळे फळे तयार होण्याच्या प्रक्रियेला बाधा पोचल्याची माहिती आहे. चोपडा, यावल, रावेर, जळगाव या तालुक्‍यांमधील तापीकाठावरील गावांमध्ये अधिकची पपई लागवड झाली आहे. तसेच पाचोरा, चाळीसगाव भागांतील गिरणा नदीच्या काठावरील गावांमध्येही पपईचे पीक आहे.

सध्या जिल्हाभरातील पपईवर विषाणूजन्य रोग दिसून येत आहे. तिच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. याचा फटका उत्पादनालाही बसत असून, शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे.
- अनिल पाटील, पपई तज्ज्ञ, जळगाव

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...