गुणवत्तापूर्ण द्राक्षसाठी पान, देठ परीक्षण महत्त्वाचे

मारुती चव्हाण
मारुती चव्हाण

सोलापूर : द्राक्षामध्ये पान, देठ आणि माती परीक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यवस्थापन सुटसुटीत करताना त्याच नियोजनावरच द्राक्षाचे गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादन मिळू शकेल, असे पलूस (जि. सांगली) येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक मारुती चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १५) येथे सांगितले. 

अॅग्रोवनच्या वतीने होम मैदानावर आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात ‘द्राक्षाच्या ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे नियोजन’ या विषयावरील चर्चासत्रात श्री. चव्हाण बोलत होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, की द्राक्षामध्ये आज चीन प्रथम क्रमांकावर आहे. त्या तुलनेत भारत नवव्या क्रमांकावर आहे. भारतात साडेतीन लाख एकरांवर द्राक्ष आहे. चीनमध्ये ११ लाख एकरांवर द्राक्षपीक आहे. येथे त्याचे उत्पादन १ कोटी १२४ लाख टनांपर्यंत आहे; तर तेच भारतात ३२ लाख टनांपर्यंत आहे. शेतीतील तंत्रज्ञान बदलते आहे. त्यात द्राक्षासारख्या संवेदनशील पिकावर जास्तच लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यासाठी द्राक्षाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्यातही पान, देठ आणि माती परीक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे द्राक्षाची शरीरयष्ठी समजू शकते. त्यामुळे पान, देठ आणि माती परीक्षणाला महत्त्व द्या. त्याशिवाय आपण फायद्यात येऊ शकणार नाही. कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो. बोद उकरून ते वापरले पाहिजे. त्यावर पीक अवशेष, उसाचे पाचट टाकून गंधक, सुपरफॉस्फेट टाकले पाहिजे. फॉस्फरस, सल्फेटची मात्रा योग्य प्रमाणात द्या.

चव्हाण म्हणाले, की द्राक्षामध्ये पाण्यालाही तेवढेच महत्त्व आहे. पाणी जास्तच दिले पाहिजे, एकूण पाण्यापैकी ४० टक्के पाणी जमीन घेते, तर ३० टक्के पाणी झाडाला लागते. आपल्याकडे बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे. त्यामुळे पाण्याची गरज द्राक्षबागांना सर्वाधिक आहे.

डाऊनी आणि भुरी नियंणत्रासाठी पीएच (सामु) नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. छाटणी घेताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विचार करून सगळ्यांनी एकत्रित घ्या. छाटणीमध्ये दोन्ही बाजूला प्रत्येकी दहाच काड्या ठेवतो. काड्या मोजून ठेवण्याचा फायदा होतो, आपापल्या बागेच्या अंतरानुसार तुम्ही गणित करू शकता, मोठी काडी असेल, तर दोन घड आणि काडी लहान असेल तर एकच काडी ठेवा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com