agriculture news in marathi, Agrowon, Lily dog searches stealing bullocks | Agrowon

‘लीली’ने शोधली चोरलेली बैलजोडी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

जालना (सकाळ वृत्तसेवा) : गोठ्यात बांधलेली बैल जोडी चोरून नेल्याच्या अनेक घटना ग्रामीण भागात नेहमीच घडत असतात. मासेगाव (ता. घनसावंगी) येथे देखील बैलजोडी चोरी गेल्याची घटना घडली. यावेळी मात्र पोलिस पथकातील'लिली' हे श्‍वान शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले. लीलीने शेतकऱ्यांची चोरी गेलेली बैलजोडी शोधून दिली.

जालना (सकाळ वृत्तसेवा) : गोठ्यात बांधलेली बैल जोडी चोरून नेल्याच्या अनेक घटना ग्रामीण भागात नेहमीच घडत असतात. मासेगाव (ता. घनसावंगी) येथे देखील बैलजोडी चोरी गेल्याची घटना घडली. यावेळी मात्र पोलिस पथकातील'लिली' हे श्‍वान शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले. लीलीने शेतकऱ्यांची चोरी गेलेली बैलजोडी शोधून दिली.

मासेगाव येथील वसंत आनंदे यांची बुधवारी (ता. १३) बैलजोडी गोठ्यातून चोरट्यांनी पळविली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तत्काळ जालना येथील श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर लिली हे श्वान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळापासून लिली श्‍वानाने तीन किलोमीटर अंतरावर एका गोठ्यापर्यंत धाव घेतली.

तेथे बांधलेली बैलजोडी पाहून भुंकण्यास सुरवात केली. त्यामुळे चोरीला गेलेल्या बैलजोडीचा शोध लागला. यामुळे शेतकरी आनंदे यांनाही दिलासा मिळाला.
या वेळी शेतकऱ्यांसह अनेकांनी उत्सुकतेपोटी गर्दी केली होती. श्‍वानपथकाचे कार्य आणि चोरीच्या घटनेत होणारी मदत याचे जणू यशस्वी प्रात्यक्षिकही अनेकांना पाहायला मिळाले. या वेळी पोलिस कर्मचारी बी. बी. पितळे, प्रदीप हवाले यांची उपस्थिती होती.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...