कर्जमाफी अर्जाची मुदत वाढवाच

कर्जमाफी अर्जाची मुदत वाढवाच

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यासाठी प्रयत्नशील शेतकऱ्यांची वणवण कायम आहे.

मंगळवारी (ता.१२) पुन्हा सर्व्हर डाउनमुळे अर्ज भरणे थांबले. बुधवारी (ता.१३) दुपारी १ वाजता सुरू झाले, तर गती मंद त्यामुळे मुदतीत शेतकऱ्यांचे अर्ज भरणे पूर्ण होणे शक्‍य नसल्याने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शनिवारअखेरपर्यंत (ता.९) २५ लाख १२ हजार ९२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ११ लाख ९८ हजार ९७७ शेतकऱ्यांचे अर्ज परिपूर्ण असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर याविषयी अपडेट माहिती अधिकाऱ्यांनाच मिळत नसल्याने नेमकी कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जाची स्थिती काय हे समजणे कठीण आहे.

पीकविमा योजनेत ऑनलाइन पीकविमा उतरविण्याचा गोंधळ संपत नाही, तोच कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यात सर्व्हर डाउनने खोडा घातला आहे. दरम्यान, शासनाने आपले नाव कर्जमाफी योजनेच्या यादीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली. मुळात याविषयी बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. माहिती असणाऱ्यांना लिंक ओपन होत नाही.

त्यामुळे ऑनलाइन कर्जमाफी अर्ज भरण्यासह यादीत आपण आहोत का नाही, आपला अर्ज चुकलाय का, हे कळायला शेतकऱ्यांना मार्ग नाही. अनेक शेतकऱ्यांचे हाताचे ठसेच मिळत नसल्याने ते अर्ज भरण्यापासून प्रयत्न करूनही वंचित राहिले असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

पंधरवड्यापासून चकरा मारतोय. आडूळ, रजापूर दोन्ही ठिकाणी प्रयत्न करूनही सर्व्हर डाउन, गती मंद यामुळे कर्जमाफीचा अर्ज भरता आला नाही. १५ तारखेपर्यंतची मुदत आहे, तोवर भरणे होईल की नाही काय माहित. पुन्हा काही चुक झाली तर कळाव कसं. -अशपाक पठाण, शेतकरी एकतूनी. जि. औरंगाबाद.

जिल्हा              लाभार्थी अर्ज (ता.९) पर्यंत औरंगाबाद        १,९७,७०४ जालना             १,६६,६९७ परभणी            १,२८,७९५ हिंगोली            ८३,९९५ लातूर               १,४४,३६३ उस्मानाबाद     ९७,४०९ बीड                 १,८१,२४१ नांदेड              १,९८,७७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com