agriculture news in marathi Agrowon Mart gets response in Baramati Agri fair | Agrowon

बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

‘सकाळ माध्यम समूहा’ने सुरू केलेल्या अॅग्रोवन मार्टची प्रतिकृती बारामती येथे आयोजित कृषिक-२०२१ प्रदर्शनात उभारण्यात आली असून, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची एकाच ठिकाणी पूर्तता करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ‘सकाळ माध्यम समूहा’ने सुरू केलेल्या अॅग्रोवन मार्टची प्रतिकृती बारामती येथे आयोजित कृषिक-२०२१ प्रदर्शनात उभारण्यात आली असून, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

बारामती येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था यांनी कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषिक-२०२१ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात ‘अॅग्रोवन मार्ट’कडून डेमो मार्ट उभारण्यात आले आहे. या डेमो मार्टचे उद्‌घाटन अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. 

कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, अॅग्रोवन अॅग्रोटेक इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश शेजवळ यांच्यासह विविध ठिकाणचे मार्ट पार्टनर उपस्थित होते.
अॅग्रोवन मार्टमध्ये कुठल्या वस्तू उपलब्ध असणार आहेत, आदींची ओळख व्हावी म्हणून हे डेमो मार्ट उभारण्यात आले आहे. यामुळे अॅग्रोवन मार्ट शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते, हे समजून घेणे सोपे झाल्याची प्रतिक्रिया डेमो मार्टला भेट दिलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. डेमो मार्टला भेट देणाऱ्यांमध्ये शेतकरी, सामान्य नागरिकांबरोबरच तरुण आणि महिलांचा मोठा सहभाग होता.

शेतकऱ्यांच्या गरजांची पूर्तता करताना विश्वासार्ह सेवा, वेळेत आणि घरपोच डिलिव्हरी, कमीतकमी किंमत आणि उत्तम दर्जा ही अॅग्रोवन मार्टची वैशिष्ट्ये आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे इनपुट मिळाले तरच तो चांगले उत्पादन घेऊ शकतो, ही बाब समोर ठेऊन आम्ही अॅग्रोवन मार्ट ही पुरवठा साखळी महाराष्ट्रभर उभी करत आहोत. या पुरवठा साखळीला ई-कॉमर्सची ही जोड देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा लाभ बांधावरच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ‘अॅग्रोवन’चे सीईओ शेजवळ यांनी या वेळी केले.

डेमो मार्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रंगनाथ कळमकर (मेगा मार्ट, नगर), विवेक वळसे पाटील (मेगा मार्ट, मंचर), अनंत गायकवाड (मेगा मार्ट, लातूर), प्रकाश देशमुख (मेगा मार्ट, नाशिक), डॉ. गणेश तावरे (मेगा मार्ट, बारामती), संग्राम पोळ (मेगा मार्ट, सांगली), प्रतीक सानंदा (मेगा मार्ट, अकोला) आदी मार्ट पार्टनर, तसचे अमितराज भगत (रेनिसन्स इन्फ्रा अॅंड इनर्जी) आणि चंद्रकांत गाडे (यश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज) हे उपस्थित होते.   

‘अॅग्रोवन’चे पुढचे पाऊल ः राजेंद्र पवार
‘सकाळ माध्यम समूहा’ने पूर्णपणे शेतीला वाहिलेले ‘अॅग्रोवन’ हे वर्तमानपत्र सुरू करताना काळाच्या पुढे जाऊन धाडसी पाऊल टाकले होते. ‘अॅग्रोवन’ आता गावागावांत रुजला आहे. आता पुन्हा एकदा ‘सकाळ’ आणि ‘अॅग्रोवन’ने मोठे पाऊल टाकले असून, ‘अॅग्रोवन मार्ट’च्या रूपाने शेतीसाठीच्या गरजा भागविणारी पुरवठा साखळी उभी केली आहे. ‘अॅग्रोवन’ प्रमाणेच अॅग्रोवन मार्टही येथे रुजेल, असा मला विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी या वेळी बोलताना दिली.


इतर अॅग्रो विशेष
विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजनवर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे...
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...