‘ॲग्रोवन‘ शेतकऱ्यांना जगाबरोबर चालण्याची संधी देणारे माध्यम : शिंदे

‘ॲग्रोवन‘ शेतकऱ्यांना जगाबरोबर चालण्याची संधी देणारे माध्यम
‘ॲग्रोवन‘ शेतकऱ्यांना जगाबरोबर चालण्याची संधी देणारे माध्यम

सोलापूर : "जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञान येते आहे, शेतीही त्याला अपवाद नाही. पूर्वी हे बदल आपल्यापर्यंत पोचायला वेळ असायचा, पण सध्याच्या धावत्या जगात हे बदल झपाट्याने काही वेळांत, मोजक्‍या दिवसांत आपल्यापर्यंत पोचत आहेत. ‘ॲग्रोवन'' सातत्याने या बदलाचा विचार करून वृत्तपत्राच्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेती-पाणी अशा विविध प्रश्‍नांसाठी काम करीत आले आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाबरोबर चालण्याची संधी हे माध्यम देते आहे,'''' असे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी गुरुवारी (ता. ५) येथे सांगितले.

सिव्हिल चौकातील ॲचिव्हर्स हॉलमध्ये ‘सकाळ-ॲग्रोवन`च्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे उद्‌घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. लेबर  फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करंडे, `ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण, `सकाळ''चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. टी. मेश्राम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘सकाळ-ॲग्रोवन` हे उपक्रमशील माध्यम आहे. गाव करील ते राव काय करील, असं म्हणतात. ग्रामीण भागातील लोकांची चळवळ सकाळ समूहाने पहिल्यापासूनच गावागावांत उभी केली. त्यामुळेच शेती-पाण्याचा प्रश्‍न असो की महिला-तरुणांचे प्रश्‍न असो, प्रत्येक कामांत या माध्यमाचा पुढाकार असतो. सक्रिय लोकसहभाग आणि लोकांची चळवळ त्यामुळेच गावागावांत रुजू शकली. वृत्तपत्राचा व्यवसाय सांभाळताना, सामाजिक बांधिलकी जपत काम करणे, हे सोपे काम नाही. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न तर फारच वेगळे आहेत. मी स्वतः शेती करायला सुरुवात केली, तेव्हा ‘ॲग्रोवन`सारखे माध्यम नव्हते. तेव्हा अन्य शेतकऱ्यांचे पाहून, अनुभव ऐकून शेती होत होती. मीही तो प्रयत्न केला. शेतकरी हा अनुकरणप्रिय घटक आहे. दुसऱ्याचे पाहिल्याशिवाय लवकर समजत नाही, प्रेरणा मिळत नाही. ‘ॲग्रोवन'' हे त्यादृष्टीने फायदेशीर आणि उपयुक्त माध्यम शेतकऱ्यांना मिळाले आहे. जगाबरोबर चालण्याची, जगभरात नवीन काय चालले आहे, हे सांगण्याचे उत्तम काम ‘ॲग्रोवन` करीत आहे. अशा प्रदर्शनातून मोठी संधी शेतकऱ्यांना मिळते आहे.''

‘ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, ‘‘ॲग्रोवन'' सोलापूरसह सांगली, नाशिक, बारामती अशा स्थानिक स्तरावर अशा पद्धतीची प्रदर्शने आयोजित करून अधिकाधिक  शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या आमची कुणाशीच स्पर्धा नाही. त्यामुळे आम्ही आमच्याशीच स्पर्धा करतो आहोत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण, हा घटक दुर्लक्षित राहिल्याने या विषयावरील वृत्तपत्र काढण्याचा ‘सकाळ'ने प्रयत्न केला. सुरवातीला लोकांना त्याबाबत साशंकता होती. पण, आज १३ वर्षांच्या एक तपाच्या यशानंतर ही साशंकता पुसली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा हे ॲग्रोवनच्या यशाचे फलित आहे. अनेक शेतकऱ्यांना या यशोगाथांनी शेतीसाठी प्रेरणा दिली. यशोगाथांशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍नही आम्ही मांडतो. सरकारदरबारी त्याची तातडीने दखल घेतली जाते.``

‘‘बोंड अळीच्या नुकसानभरपाईचा असाच विषय आम्ही लावून धरला. आज त्याच्यावर सरकार गांभीर्याने विचार करते आहे. विविध ठिकाणांवरील प्रदर्शने, ॲग्रोसंवाद, सरपंच महापरिषद यांसारख्या उपक्रमातून संवाद वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण, ‘ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड`च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सन्मान देण्याचाही प्रयत्न करतो आहोत. शेतीच्या प्रत्येक प्रश्‍नावर जागल्याची भूमिका आम्ही पार पाडतो आहोत,'' असे चव्हाण यांनी सांगितले.

‘सकाळ''चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी म्हणाले, ‘‘सकाळ नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करीत आले आहे. ग्रामीण भागातील अनेक विषय ‘सकाळ`ने हाताळले. गावतलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमात लोकांनी दिलेला सहभाग आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि मोलाचा ठरला. लोकसहभाग हे आमच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य असते. या सगळ्या कामामध्ये लोकसहभाग असतोच, पण विविध लोकप्रतिनिधीही तेवढ्याच हिरीरीने सहभाग घेतात. लोकांसाठी लोकांच्या सहकार्यातून सकारात्मक पत्रकारिता आम्ही करतो.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com