‘ॲग्रोवन' ॲपने ओलांडला ५ लाख डाउनलोडचा टप्पा !

‘ॲग्रोवन' ॲपने ओलांडला ५ लाख डाउनलोडचा टप्पा !
‘ॲग्रोवन' ॲपने ओलांडला ५ लाख डाउनलोडचा टप्पा !

पुणे ः गेल्या १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य बनलेल्या सकाळ माध्यम समूहाच्या दैनिक ‘ॲग्रोवन'ने डिजिटल व्यासपीठावरही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. ‘ॲग्रोवन ॲप’ने नुकताच ५ लाख ‘डाउनलोड’चा टप्पा पार करून थेट शेताच्या बांधावर बळिराजाला कृषी-ज्ञान तंत्रज्ञान दररोज पोचविण्यात यश मिळविले आहे.  गेल्या दीड दशकापूर्वीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर ‘मोबाईल क्रांती’ने जग आज व्यापले. ८० च्या दशकात इंटरनेट दारी येताच ‘जगाला खेड्याचे स्वरूप येईल’ असे म्हटले गेले आणि मोबाईलच्या माध्यमातून ते खरेच ठरेल आहे. अगदी खेडेगावातच नव्हे, तर बांधावर असलेला शेतकरीही या जागतिक खेड्याचा रहिवासी झाला आहे. अॅग्रोवन अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकला क्लिक करा... ‘सकाळ माध्यम समूहा’नेसुद्धा २००५ मध्ये दैनिक ॲग्रोवन सुरू करण्यापूर्वीच ॲग्रोवनची वेबसाईट तयार करून ‘ग्लोबल शिवारा’त प्रवेश केला होता. २००८ मध्ये मोबाईलमधील ॲंड्रॉईडनंतर ॲप तंत्रज्ञान रुजू होताच नव्या बदलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ॲग्रोवननेही अडीच वर्षापूर्वी ‘ॲग्रोवन ॲप’ रुजू केल्यानंतर अवघ्या महिन्यातच शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या काळात एक लाख डाउनलोड करण्यात आले.  थेट बांधावर कृषी क्षेत्रातील माहितीचा खजिना मिळाल्याने ‘ॲग्रोवन' ॲपला दिवसागणिक प्रतिसाद वाढू लागला. विशेषत: युवा शेतकऱ्यांचा प्रतिसाद उल्लेखनीय राहिला. या प्रतिसादामुळेच नुकताच ‘ॲग्रोवन' ॲपने ५ लाखांवर डाउनलोडचा टप्पा ओलांडला. ॲग्रोवन वेबसाईट, ई-पेपर, ॲप यांसह फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब या समाज माध्यमांच्या व्यासपीठांवरही ‘ॲग्रोवन' कार्यरत आहे. या माध्यमातून दररोज लाखो शेतकऱ्यांपर्यंत कृषी ज्ञान-तंत्रज्ञान, घटना-घडामोडी पोचविण्याचे काम सुरू आहे.  अॅग्रोवन अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकला क्लिक करा... असे करा ॲग्रोवन ॲप डाउनलोड  आपल्या मोबाईलवर google play store ला जा. तेथे AGROWON app असे सर्च करा. काही क्षणात ‘ॲग्रोवन’च्या लोगोसह ॲप आपल्याला दिसेल. Install ऑप्शनवर क्लिक करा. ॲप डाउनलोड होताच, ते Open करा आणि कृषी क्षेत्रातील ज्ञान-तंत्रज्ञान, यशोगाथा, दररोजच्या घडामोडी, ताजे बाजारभाव, आपल्या भागातील आजच्या हवामानासह असंख्य विषयांचा लाभ घ्या.   अॅग्रोवन अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकला क्लिक करा...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com