agriculture news in marathi, agrowon, Monsoon, weather update, maharashtra | Agrowon

कोकण, गोव्यात पावसाचा अंदाज

संदीप नवले
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हवेचा दाब वाढल्यामुळे पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. या भागातील अनेक ठिकाणी सध्या हवामान ढगाळ असून, काही ठिकाणी ऊन पडत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे.

पुणे : सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवेचा दाब कमी होत आहे, त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या गुरुवार (ता. 21) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आज (सोमवारी) कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसासह, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे.

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल; कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रविवारी (ता. 17) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुणे परिसरातही काही ठिकाणी सरी पडण्याची शक्‍यता आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी रविवारी बरसल्या असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातही बारामती परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. साताऱ्यातील महाबळेश्वर भागातही हलका पाऊस पडला.

उर्वरित नगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक भागांत ढगाळ हवामान होते. काही वेळा अधूनमधून ऊन पडत होते. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव भागात ऊन पडल्याचे चित्र होते. मराठवाडा व विदर्भातही काही भागांत ढगाळ, तर काही ठिकाणी ऊन  होते. त्यामुळे वातावरणातील उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती.

कोकणातील सांगे येथे अतिवृष्टी झाली, तर म्हापसा येथे जोरदार पाऊस पडला असून, उर्वरित भागात रविवारी सकाळपर्यंत हलक्‍या सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्रातील जामखेड, राहाता येथे अतिवृष्टी झाली.

शिरपूर, पाथर्डी, सटाणा, बागलाण येथे जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील जाफराबाद, केज येथेही मध्यम स्वरूपाचा, उर्वरित भागांत हलका पाऊस पडला. विदर्भातील देऊळगाव, राजा, चिखलदरा, नेर अशा काही ठिकाणी हलका
पाऊस पडला.

रविवारी (ता. 17) सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
कोकण ः सांगे 80, म्हापसा 50, मार्मगोवा, पणजी 40, दाभोलीम, मुंबई, पालघर, फोंडा, शहापूर, तलासरी, वाल्पोई 30, अलिबाग, बेलापूर, कुडाळ, मुल्दे,
पोलादपूर, संगमेश्वर देवरूख 20, भिवंडी, कानकोन, देवगड, दोडामार्ग, कर्जत, खालापूर, खेड, लांजा, मंडणगड, माथेरान, मुरूड, पेडणे, केपे, रत्नागिरी, सावंतवाडी,
उरण 10
मध्य महाराष्ट्र ः जामखेड 80, राहाता 70, शिरपूर 60, पाथर्डी 50, मालेगाव, सटाणा, बागलाण 40, चांदवड, देवळा, खंडाळा, बावडा, नवापूर, नेवासा, पुरंदर,
श्रीरामपूर 30, धुळे, गडहिंग्लज, माळशिरस, पेठ, रावेर, वाई 20, अक्कलकुवा, दहिवाडी, माण, गगनबावडा, गिधाडे, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाचोरा, पन्हाळा,
राहुरी, शाहूवाडी, शिराळा, सुरगाणा, येवला 10
मराठवाडा ः जाफराबाद, केज 50, फुलंब्री 30, गंगापूर, परतूर 20, अहमदपूर, मंठा, शिरूरकासार 10
विदर्भ ः देऊळगावराजा 30, चिखलदरा, नेर 20, आर्वी, चिखली, मंगळरूळपीर, तेल्हारा 10

 


इतर अॅग्रो विशेष
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...