agriculture news in Marathi, agrowon, For the movement of milk Farmers' committee work | Agrowon

दूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष समितीचा जागर
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 मे 2018

वैजापूर, जि. औरंगाबाद  : दूधदराच्या प्रश्‍नांवर प्रत्येक तहसील कार्यालयावर येत्या १ जूनला करावयाच्या इशारा आंदोलनासाठी वैजापूर तालुका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती कामाला लागली आहे. उत्पादकांना दुधाचे दर शासनाने जाहीर केल्यानुसार मिळावेत, यासाठी आधीच संघर्षाचा बिगुल वाजविण्यात आला आहे. 

वैजापूर, जि. औरंगाबाद  : दूधदराच्या प्रश्‍नांवर प्रत्येक तहसील कार्यालयावर येत्या १ जूनला करावयाच्या इशारा आंदोलनासाठी वैजापूर तालुका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती कामाला लागली आहे. उत्पादकांना दुधाचे दर शासनाने जाहीर केल्यानुसार मिळावेत, यासाठी आधीच संघर्षाचा बिगुल वाजविण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दूध उत्पादक संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तालुक्‍यातील लाखगंगा येथे १८ मे ला आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी बैठक पार पडली होती. या बैठकीत फूकट दूधवाटप आंदोलनानंतर शासनाने उत्पादकांसाठी दुधाचे दर जाहीर केल्याप्रमाणे २७ रुपये प्रतिलिटरप्रमाणे मिळावे, यासाठी कोणती पावले उचलली याविषयी चिंतन करण्यात आले. 

चिंतनाअंती शासनाने दूध भुकटीला अनुदान देऊन उत्पादकांना दर देण्यासाठी ठोस काहीच न केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दुधाला रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी मिळून सरकारला जाग आणण्यासाठी १ जून २०१८ रोजी राज्यातील आपापल्या तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात आपली भाकड जनावरे बांधून आदोलन करण्याचे ठरविण्यात आले. हे इशारा आंदोलन असेल त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास ५ जुनला दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर याच्या मुंबई येथील घरासमोर दुग्धाभिषेक सत्याग्रह करणार आहेत. नियोजनानुसार न्यायासाठीच्या या लढ्याविषयी जागराचे काम हाती घेण्यात आले आहे.

 वैजापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी १ जूनला सकाळी ११वाजता वैजापूर तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती वैजापूर तालुक्‍याच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...