मुंबईत कांदा प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये

भेंडीची ३३४ क्विंटल आवक झाली होती, तीस२४०० ते ३००० व सरासरी २७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फ्लॉवरची ७९२ आवक झाली होती, त्यास १६०० ते २००० व सरासरी १८०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
कांदा
कांदा

मुंबई : मुंबई बाजार समितीत शेतमालाची बुधवार (ता. १३) मार्केटमध्ये ५५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. कांद्याची ९८०० क्विंटल आवक झाली होती. त्यास १८०० ते २००० व सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी (ता. १२) लसणाची ६४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ५००० व सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. बटाट्याची ११६०० क्विंटल आवक होऊन त्यास ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. लिंबाची ५०५ क्विंटल आवक होऊन झाली होती. त्यास ४० ते १०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. वाटाण्याची १११५ क्विंटल आवक झाली होती, त्यास सरासरी ४५०० रुपये दर मिळाला, असे व्यापारी नानासाहेब बोरकर यांनी सांगितले. डाळिंबाची २१८२ क्विंटल आवक झाली होती त्यास सरासरी दर २१२५  रुपये इतका होता.  भुईमूग शेंगांची १९० क्विंटल आवक झाली होती, त्यास ३००० ते ५००० व सरासरी ४००० रुपये दर मिळाला. आल्याची १०२४ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रतिक्विंटल २००० ते २२०० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भेंडीची ३३४ क्विंटल आवक झाली होती, तीस २४०० ते ३००० व सरासरी २७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फ्लॉवरची ७९२ आवक झाली होती, त्यास १६०० ते २००० व सरासरी १८०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) शेतमाल-----------आवक-----किमान-----कमाल-----सरासरी गवार---------------७१३-------२०००-------४०००-------३००० शेवगा--------------७५१-------२८००-------३८००-------३३०० टोमॅटो नं१---------३६११-------१४००-------१६००------१५०० वांगी---------------३६०-------१६००-------२०००-------१८०० हिरवी मिरची-----१५००-------२२००------२४००------२२०० डाळिंब-----------२१८२-------७५५०-------२७००-------२१२५ मोसंबी----------२५०५-------१५५०-------२७००-------२१२५ पपई------------२५०५-------१६५०-------२९००-------२२७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com