डॉ. पतंगराव कदम अनंतात विलीन; साश्रुनयनांनी निरोप

डॉ. पतंगराव कदम अनंतात विलीन; साश्रुनयनांनी निरोप

कडेगाव, जि. सांगली  : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी (ता. १०) सायंकाळी सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राजीव सातव, खासदार उदयनराजे भोसले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार बाळासाहेब पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुधीर गाडगीळ, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय सामाजिक व न्याय राजमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, मोहन प्रकाश, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

या वेळी शोक सभेत सर्व प्रमुख नेत्यांनी डॉ. कदम यांना आदरांजली वाहिली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती संघर्षातून त्यांनी शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तुंग काम केले आहे. त्यांचे अचानक जाणे हे राज्याला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याचे आणि सांगलीचे मोठे नुकसान झाल्या मत नेत्यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी डॉ. कदम यांचे पार्थिव मूळ गावी सोनसळ येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी संपूर्ण गाव सुन्न झालं होत. जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, या जिल्ह्यातील लाखोंचा जनसमुदाय लोटला. डॉ. कदम यांनी मागील तीन ते चार दशकांच्या काळात सामाजकारण, राजकारण आणि विविध संस्थांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिल्याच्या आठवणी गावातील जनतेनी जागविल्या.

पंचक्रोशीतील गावातील सर्व व्यवहार बंद करून सकाळपासून त्याच्या सोनसळ येथील घरासमोर नेत्यांची गर्दी झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी आल्यानंतर गावकऱ्यांना गहिवरून आले होते. गेल्या दोन, अडीच महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे डॉ. कदम यांना गावी येणे शक्य झाले नव्हते, साहेब बरे होऊन परत येतील, अशी आशा गावकऱ्यांना होती. मात्र डॉ. कदम यांचे पार्थिव पाहून जनतेचा बांध फुटला. सायंकाळी ६ च्या सुमारास जिल्हा पोलिस दलाने सलामी दिली. त्यानंतर त्याचे पुत्र डॉ. विश्वजित कदम यांनी अग्नी दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com