विषारी `रॅगवीड’ तणाचा महाराष्ट्रात शिरकाव !

रॅगवीड हे परदेशी तण असून त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्याचे आढळून आले आहे. हे तण एॅम्बरोसिया या प्रजातीतील असून त्याच्या जगभरात ४१ प्रजाती आहेत. या सर्व प्रजाती समूहाला रॅगवीड'''' (Ragweed) या नावाने जगभर ओळखले जाते.
`रॅगवीड’ तणाचे  नियंत्रण
`रॅगवीड’ तणाचे नियंत्रण

अनेक परदेशी तणांनी भारतात प्रवेश करून इथल्या शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. रॅगवीड या आणखी एका तणाचा प्रवेशही देशात झाला आहे. पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथे हे तण आढळले आहे. या विषारी तणाचा शेतीबरोबरच मानवी व जनावरांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकताे. त्यामुळे त्याच्या प्रसारास वेळीच अटकाव करणे आवश्‍यक आहे.  

रॅगवीड हे परदेशी तण असून त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्याचे आढळून आले आहे. हे तण एॅम्बरोसिया या प्रजातीतील असून त्याच्या जगभरात ४१ प्रजाती आहेत. या सर्व प्रजाती समूहाला रॅगवीड'''' (Ragweed) या नावाने जगभर ओळखले जाते.

वनस्पतींचा अभ्यास करताना आम्हाला "ऍम्बरोसिया ऍरटिमीसिफोलिया (Ambrosia artemisiifolia) ही वनस्पती पेठवडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील शेतात आढळून आली. ही तणवर्गीय वनस्पती आहे. या तणाचे मूळ स्थान उत्तर अमेरिका आहे. वनस्पतीचा आढळ हे तण १८६० पूर्वी केवळ उत्तर अमेरिकेत पसरले होते. त्यानंतर ते युरोप खंडातील युरेशिया, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी, क्रोएशिया, बल्गेरिया आदी देशांत पसरले. सन १९७० पर्यंत ते उत्तर अमेरिका व युरोप खंडापुरतेच मर्यादित होते. त्यानंतर त्याचा प्रसार वेगाने दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, तैवान व चीन आदी देशांत झाला. भारतातील नोंद १९९६ मध्ये हे तण भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड या राज्यांत आढळून आले. आजअखेर रॅगवीड तणाची शास्त्रीय नोंद ईशान्य भारताशिवाय देशाच्या उर्वरित भागात झाली नव्हती. मात्र तण पेठवडगाव भागात ते आढळल्याने त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्याचे स्पष्ट झाले अाहे. याबाबतचा संशोधन निबंध (रिसर्च पेपर) आम्ही "बायोसायन्स डिस्कव्हरी'''' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केला.

तणाचे नैसर्गिक पुनरोत्पादन व त्याच्या प्रसाराबाबत अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवल्या आहेत. हे तण अन्यत्र पसरत असून त्याची व्याप्ती वाढत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. वनस्पतीचे वर्णन

  • ऍम्बरोसिया ऍरटिमीसिफोलिया'' ही रोपवर्गीय वनस्पती. तीस ते ९० सेंमी उंचीपर्यंत वाढते.
  • उग्र वास. फांद्या सरळ वाढतात. खोड व फांद्यांवर बारीक केसाळ लव
  • पाने साधी मात्र लहान भागात विभागलेली, कातरलेली व लवयुक्त
  • फुले येण्यापूर्वी हुबेहूब कॉंंग्रेस गवतासारखी दिसते.
  • फुले जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत येतात. फुले लहान, पांढरट-पिवळसर रंगाची. गोलाकार पुष्पगुच्छात येतात.
  • एक रोप शंभर दशलक्ष ते ३० कोटी परागकण तयार करते.
  • फळे गोलाकार त्रिकोणी आकाराची. त्याभोवती काटेरी पुष्पपर्णे. फळात त्रिकोणी - गोलाकार बी.
  • एक रोप वर्षभरात तीनहजार बिया तयार करते. फळे काटेरी असल्याने ती कशासही सहजपणे चिकटतात व त्यांचा वेगाने प्रसार होतो.
  • फळांचा-बियांचा प्रसार प्राणी, पक्षी व माणसे, पाण्यामार्फत
  • बिया निसर्गात ३९ वर्षांपर्यंत अबाधित राहू शकतात व सहजपणे रुजतात.
  • मे-जून महिन्यात ९५ ते ९८ टक्के बिया रुजतात व नवीन रोपे तयार होतात.
  • प्रसार हे तण वेगाने वाढते व पसरते. प्रामुख्याने शेतात तसेच गवताळ कुरणे, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, नदी काठावर आढळते. स्थलांतरीत पक्षांच्या विष्ठेतून तणाचा प्रसार दूरवर अनेक देशांत झाला असावा असे मानले जाते. आयात करण्यात येणाऱ्या सूर्यफुलांच्या बियांमध्ये रॅगवीडच्या बिया मिसळलेल्या आढळतात.

    आयात केलेल्या कोंबडी खाद्यात तसेच पाळीव पक्षांच्या खाद्यातही त्याच्या बिया आढळतात. एक किलो पक्षी खाद्यात ३.६ ग्रॅम वजनाच्या रॅगवीडच्या ७०० बिया आढळल्या आहेत. शेतातील अवजारे, वाहने व जनावरांना चिकटून, मातीच्या वाहतुकीतून व कंपोष्ट खतातून बियांचा प्रसार होतो. विषारी गुणधर्म व होणारे नुकसान या तणामुळे पीक उत्पादनात घट होऊन नुकसान होते. विषारी असल्याने जनावरांच्या व प्रामुख्याने माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या तणाचे परागकण ॲलर्जी निर्माण करणारे आहेत.

    परागकणात ऍम्ब्रोसिन, आयसाबेलीन, सायलोस्टॅचीन, क्‍युमॅनीन, पेरूव्हीन (Peruvin) व अमायरिन हे सहा प्रकारचे ऍलर्जी निर्माण करणारे घटक आहेत. परागकणांत ओलिओरेझिन्सही आढळतात. आरोग्यावर परिणाम

  • फुलांच्या तीन-चार महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात परागकण तयार केले जातात. ते हवेत पसरतात. हवेमार्फत परागकण माणसाच्या सान्निध्यात आल्यास नाक व घसा सुजतो, श्‍वसननलिकेस सूज येते.
  • सर्दी, खोकल्याचा त्रास. अंगात ताप. डोळे खाजतात, सुजतात व लाल होतात. त्वचेवर तांबडे पट्टे (रॅशेस) तयार होऊन खाज सुरू. त्वचेवर गाठी तयार होतात.
  • पानांत उग्र वासाचे तेल असून ते ॲलर्जीक आहे.
  • या ॲलर्जी रोगांवर उपचार करण्यासाठी इटली व फ्रान्स या देशांना दरवर्षी दोन दशलक्ष युरो खर्च करावे लागतात.
  • सन २००० मध्ये ‘रॅगवीड’ तणाबाबतची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद हंगेरी देशात झाली. त्यावरून त्याची व्यापकता लक्षात येते.
  • हे तण जनावरांसाठीही विषारी. तणाच्या सान्निध्यात आल्यास त्यांनाही ॲलर्जीचा त्रास. उग्र वासामुळे जनावरे हे तण खात नाहीत. अन्य चाऱ्यांसोबत ते खाल्ल्यास दुधास उग्र वास येतो.
  • नियंत्रणाचे उपाय
  • तण नियंत्रणासाठी परदेशात खालील उपाय सुचविले आहेत...

  • तणनाशकांचा वापर- उदा. ग्लायफोसेट व अन्य  
  • मात्र भारतात त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • जैविक नियंत्रण- तणाच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धत जास्त परिणामकारक आहे. उदा. रॅगवीडच्या पानावर उपजीविका करणारे कीटक टाराचिडिया कॅन्डीफेक्‍टा, ओपरियेला स्लोबोडिक्‍नी, झायगोग्रामा डिसरुप्टा
  • तणाच्या पानांवरील बुरशी- पक्‍सिनिया झॅनती
  • परागकोष व परागकणांवर उपजीविका करणारे कीटक- ट्रायगोनोर्हिनस टोम्पन्टोसस  
  • बियांवर उपजीविका करणारे कीटक- स्मिक्रोनक्‍स परप्युसिलस, युरेस्टा बेला
  • रॅगवीड तणाचा अभ्यास करताना त्याच्या पानांवर आम्हाला झायगोग्रामा डिसरुप्टा हे कीटक व त्यांच्या पाने खाणाऱ्या अळ्या आढळल्या आहेत.  
  • संपर्क: डॉ. मधुकर बाचूळकर, ९७३०३९९६६८   (डॉ. बाचूळकर हे निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष व वनस्पतीतज्ज्ञ असून प्रा. जगताप हे विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ-वडगाव येथे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com