agriculture news in Marathi, agrowon, Provide funds for organic farming | Agrowon

सेंद्रिय शेतीसाठी निधीची तरतूद करा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे  ः सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक सेंद्रिय शेती वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करून निधीची तरतूद करा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्या. 

पुणे  ः सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक सेंद्रिय शेती वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करून निधीची तरतूद करा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्या. 

कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन व जलयुक्त शिवार अभियान सनियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्तलयात गुरुवारी (ता. १२) झाली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल, आमदार भीमराव तापकीर, बाळा भेगडे, राहुल कुल, सुरेश गोरे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित होते. 

श्री. बापट म्हणाले, शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत; परंतु सेंद्रिय खत उपलब्ध होत नाही. त्यासाठी पशुधन वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेणखत घ्यावे लागते.

प्रत्येक गावात जनावरांना एकत्रित करून एखाद्या ठिकाणी सेंद्रिय खत प्रकल्प उभा करून त्या माध्यमातून सेंद्रिय खत शेतकऱ्यांपर्यंत पोचविले पाहिजे. यासाठी सेंद्रिय खताचे प्रकल्प उभा केले, तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध होईल. सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्या संदर्भातील नवीन आराखड्याची निर्मिती करावी. गेल्या वर्षी ९६२ पॉस मशिनद्वारे किती शेतकऱ्यांना खते दिली. या मशिनद्वारे किती शेतकऱ्यांना फायदा झाला. किती मेट्रिक टन खत याद्वारे दिली याची माहिती अधिकाऱ्यांकडून मागितली असता, त्यावर संबधित अधिकाऱ्यांनी माहिती नसल्याचे उत्तर दिले. त्यावर गिरीश बापट यांनी उदाहरण देत संबधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 

उन्हाळ्यात जलयुक्तच्या कामावर भर द्यावा 
जलयुक्तची कामे करण्यासाठी अवघी दोन महिने बाकी आहेत. भविष्यातील टँकरमुक्त जिल्हा करण्यासाठी जलयुक्तची कामे महत्त्वाची आहेत. येत्या दोन महिन्यांत ती गतीने करणे गरजेचे आहे. या कामामध्ये टेंडरची कामे अजून शिल्लक आहेत. त्यामुळे कामे करण्यास उशीर होतो. या विषयाचे गांभीर्य ओळखून यावर अधिक भर देण्याची गरज आहे. याशिवाय धरणातील गाळ काढण्यासाठी प्रशासनाने  पुढाकार घ्यावा. त्यासोबत आणखी स्वयंसेवी संस्थाचा सहभाग मिळत असेल तर त्यांनाही सहभागी करून घ्यावे. त्यासाठी गावपातळीवर अधिकाऱ्यांनी संपर्कात राहून गावातही गाळ काढण्याची कामे हाती घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. 

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...