agriculture news in Marathi, agrowon, Pune Zilla Parishads stamp charges claim Unrestricted | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेचा मुद्रांक शुल्कावरील हक्क अबाधित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे  ः पुणे जिल्हा परिषदेला जमीन, सदनिका खरेदी- विक्री व्यवहारातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कापैकी एक टक्के निधी मिळण्याचा हक्क कायम ठेवण्याचा निर्णय मुंबईत सोमवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकारणासाठी (पीएमआरडीए) निधी उपलब्ध करण्यासाठी इतर स्त्रोत उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली. 

पुणे  ः पुणे जिल्हा परिषदेला जमीन, सदनिका खरेदी- विक्री व्यवहारातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कापैकी एक टक्के निधी मिळण्याचा हक्क कायम ठेवण्याचा निर्णय मुंबईत सोमवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकारणासाठी (पीएमआरडीए) निधी उपलब्ध करण्यासाठी इतर स्त्रोत उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली. 

जिल्ह्यातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयांमध्ये जमीन, घर आणि सदनिका खरेदी-विक्री व्यवहारांसाठी आकारण्यात येणाऱ्या सहा टक्के मुद्रांक शुल्कापैकी एक टक्का मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला मिळते. जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या १ हजार ८६६ गावांसाठी १ हजार ४०१ ग्रामपंचायतींद्वारे विविध विकासकामांसाठी या निधीचा वापर केला जातो. 

पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर ८५० हून अधिक गावे पीएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कातील एक टक्का वाट्यापैकी आर्धा टक्का पीएमआरडीएला मिळावा, असा प्रस्ताव पीएमआरडीएने नगरविकास खात्याला पाठविला होता. विकासकामे आणि विविध सुविधा देणाऱ्या जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्कापोटी गतवर्षी २८९ कोटी रुपये उपलब्ध होणार होते. दरम्यान, मुद्रांक शुल्कातील वाटा देण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांनी यापूर्वी कडाडून विरोध केला होता.

जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या अनुदानातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासाच्या योजना हाती घेते. यात मुद्रांक शुल्काचा मोठा वाटा असून, त्यावरच जिल्हा परिषदेचा विकास अवलंबून आहे. हे अनुदानच कपात केले तर त्याचा जिल्हा परिषद अंदाजपत्रक, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे कामकाजावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुद्रांक शुल्काच्या वाट्यात कपात न करता, पीएमआरडीएला इतर स्त्रोत्रातून अनुदान उपलब्ध करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे देवकाते यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...