हमीभावाने हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणीस सुरवात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः शेतकरी प्रतीक्षा करीत असलेली शासनाची हरभरा खरेदीची प्रक्रिया अखेरीस सुरू झाली अाहे. सोमवारपासून  (ता. पाच) अाॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात अाली असून, तातडीने खरेदीसुद्धा केली जाणार असल्याची माहिती मिळाली अाहे. २९ मे २०१८ पर्यंत ही हरभरा खरेदी केली जाणार अाहे. ज्या भागात हरभरा लागवड अाहे तेथे-तेथे खरेदी केंद्र उघडले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

या हंगामात लागवड झालेल्या हरभऱ्याची काढणी जानेवारीपासूनच सुरू झाली. असे असताना बाजारपेठांमध्ये ३३०० ते ३६५० दरम्यान हरभरा विकत अाहे. वास्तविक, हरभऱ्याला ४२५० रुपये हमीभाव व १५० रुपये असा मिळून ४४०० रुपयांचा दर शासनाने जाहीर केला अाहे. मात्र कुठल्याही बाजारात एवढा दर मिळाला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. 

संपूर्ण फेब्रुवारी महिना तसाच गेला. त्यानंतर अात अाॅनलाइन नोंदणीचे व त्यानंतर लगेच खरेदीबाबतचे अादेश जिल्हा यंत्रणांना देण्यात अाले अाहेत. राज्यात या हंगामात कमी व अनियमित पावसामुळे हरभऱ्याच्या लागवडीला फटका बसला आहे. हरभरा पिकाला एकरी नऊ ते साडेनऊ हजार रुपये खर्च लागला अाहे; तर या वर्षी कमी पावसाचा अाणि पीक काढणीला अाले असताना गारपिटीचा मोठा तडाखा बसला. परिणामी, उत्पादकता एकरी तीन ते सहा क्विंटलदरम्यान उत्पादकता अाहे. शासनाने हमीभावाने खरेदीला साधारणतः महिनाभरापूर्वीच सुरवात केली असती तर निदान हमीभाव तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडला असता. अातापर्यंत हजारो क्विंटल हरभरा बाजार समित्यांमध्ये ३००० ते ३५०० दरम्यान विकल्या गेला अाहे.

अाता हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत असल्याने हरभऱ्याचे समाधानकारक दर मिळतील, अशी शक्यता अाहे. नाफेड व इतर एजन्सींच्या माध्यमातून तूर खरेदी प्रमाणेच ही हरभरा खरेदी प्रक्रिया राबवली जात अाहे.   

हरभरा खरेदीसाठी १८५ केंद्र महाराष्ट्र स्टेट काे-अाॅप-मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-अाॅप मार्केटिंग फेडरेशनमार्फत हरभरा खरेदीबाबत जिल्हा यंत्रणांना अादेश देण्यात अाले अाहेत. सध्या १८५ ठिकाणी तूर खरेदी केंद्र उघडण्यात अाले असून एवढ्याच केंद्रावर हरभरा खरेदी केली जाईल. गरज असेल तर केंद्र वाढवलेसुद्धा जातील. शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी अाॅनलाइन नोंदणी करावी, असे अावाहन पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केले.

नावनोंदणीचे अावाहन हरभरा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी अाॅनलाइन पद्धतीने नावनोंदणी करणे गरजेचे अाहे. नावनोंदणीसाठी अाधार, सातबारा, पेरेपत्रक, बँक खात्याचे डिटेल्स अशी माहिती देणे गरजेचे अाहे. खरेदी सुरू होताच खरेदी केंद्रावर हरभरा अाणण्याबाबत शेतकऱ्यांना मेसेज दिले जाणार अाहेत. हरभऱ्यामध्ये १४ टक्के अार्द्रता स्वीकारली जाईल. शिवाय एफएक्यू दर्जाचाच शेतीमाल खरेदी केला जाणार अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com