तूर खरेदीचे अडथळे संपता संपेनात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः तूर खरेदीला मुदतवाढ दिली असली तरी खरेदीचे शुक्‍लकाष्ट काही संपायला तयार नाही. तूर खरेदीच्या मुदतवाढीला पाच दिवस झाले असले तरी अजूनही वेगवेगळ्या कारणाने खरेदी सुरू नाही. त्यात आता एक दिवस पुरेल एवढाच बारदाना शिल्लक असल्याने खरेदी अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. तातडीने बारदाना उपलब्ध झाला नाही, तर खरेदी बंद पडणार असल्याचे माहिती केंद्र चालकांकडून मिळाली आहे.   

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या आडीच-तीन महिन्यांपासून दहा खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ६२ कोटी रुपये किमतीची एक लाख तेरा हजार ७३८ क्विंटल तुरीची खरेदी झाली. आतापर्यंत ११ हजार ५४० शेतकऱ्यांनी तूर विक्री केली असली तरी १६ हजार ९३ शेकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली असल्याने अजूनही चार हजार सहाशे ५३ शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. १८ एप्रिलपासून शासनाने तूर खरेदी बंद केली होती. मात्र, ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्याने त्याआधीच तीन दिवस खरेदी बंद होती. 

अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीही करता आली नाही. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली असतानाही खरेदी झाली नसल्याने व अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक असल्याच्या मागणीनंतर केंद्र सरकारने तूर खरेदीला मुदतवाढ दिला आहे. मुदतवाढीचे पत्र येऊन पाच दिवसांचा कालावधी संपला असला तरी अजूनही वेगवेगळ्या कारणाने तूर खरेदी झाली नाही. त्यात आता बारदान्याची अडचण निर्माण झाली आहे. 

सध्या एक दिवस पुरेल एवढाच बारदाना शिल्लक आहे असे एका केंद्र चालकाने गुरुवारी (ता. २६) सांगितले. राज्य खाद्य निगम महामंडळाकडे तीनशे गाठीची (दीड लाख गोण्यांची) पुणे कार्यालयाकडे मागणी केली असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. मागणी केली तेवढ्या गोण्या उपलब्ध झाल्या तर साधारण ७५ हजार क्विंटल तूर-हरभरा खरेदी होईल असा अंदाज आहे. मात्र, आज (शुक्रवार) पर्यंत बारदाना उपलब्ध झालेला नव्हता. जिल्ह्यामध्ये अजून साधारण पंचवीस हजार क्विंटल तूर खरेदी अपेक्षित आहे. आतापर्यंत बारा केंद्रांवर हरभरा खरेदी चालू आहे. ५३ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com