कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार अंदाज

पुणे  ः मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा कर्नाटककडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. गुरुवारपर्यंत (ता.१४) कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

आज (ता. १२) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी; तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी; तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मंडळांत सोमवारी (ता.११) जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलका पाऊस पडला.

सांगलीतील तासगावच्या पूर्व भागातील सावळज येथे रिमझिम पाऊस झाला. मराठवाड्यातील रेणापूर, अंबाजोगाई, केज, माजलगाव यासारख्या काही ठिकाणी हलका पाऊस पडल्याचे चित्र होते. विदर्भातील बुलडाणा, कळंब, भिवापूर, चांदूरबाजार, गोंदिया, मालेगाव येथेही हलका पाऊस पडला.

सोमवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत पाऊस ः मिलिमीटरमध्ये कोकण ः महाड, सावंतवाडी १००, माणगाव ९०, चिपळूण, वैभववाडी ७०, कणकवली, लांजा ५०, दोडामार्ग, कुडाळ, पोलादपूर ३०.

मध्य महाराष्ट्र ः नवापूर ९०, पाचोरा ७०, दौंड, नांदगाव ५०, हरसूल, राधानगरी ४०, गारगोटी, खंडाळा, बावडा, पौंड, मुळशी, साक्री, सुरगाणा, वाई ३०.

मराठवाडा ः रेणापूर २०, अंबाजोगाई, केज, माजलगाव १०.

विदर्भ ः बुलढाणा, कळंब २०, चांदूरबाजार, गोंदिया, मालेगाव १०. घाटमाथा ः ताम्हिणी ६०, शिरगाव, डुंगरवाडी ५०, दावडी ४०, भिरा, अंबोणे, खोपोली ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com