सप्टेंबरमध्ये तेरा दिवसांत सरासरीच्या २७ टक्के पाऊस

पाऊस, माॅन्सून
पाऊस, माॅन्सून

पुणे ः यंदा सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र गेल्या पावसाचे चित्र बघता अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. एक ते १३ सप्टेंबर या कालावधीतील सरासरी २०२. १ मिलिमीटर एवढी आहे. मात्र, या तेरा दिवसांत अवघा ५५.८ मिलिमीटर म्हणजे २७.६ टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील २०६६ मंडळांपैकी तब्बल ९४१ मंडळांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.   येत्या दहा ते पंधरा दिवसांत या मंडळांत चांगला पाऊस झाल्यास पाणीटंचाई कमी होईल. अन्यथा आगामी काळात या मंडळांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीचा आठवड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. परंतु, ८ सप्टेंबरपासून पावसाला पुन्हा सुरवात झाली. त्यानंतर राज्यात कमी अधिक पाऊस होत होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील काही भागांतच पाऊस झाला आहे. परंतु, तेरा दिवसांतील पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता अनेक भागात कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. पन्नास टक्केहून कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यामध्ये कोकणातील पालघर जिल्ह्याचा समावेश आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातही कमी पाऊस झाला आहे. 

तेरा दिवसांत कोकण विभागात सरासरी ३७९.० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. परंतु, प्रत्यक्षात अवघा १०१.८ मिलिमीटर म्हणजेच २६.९ टक्के पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक विभागात सरासरी १५८.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात ३८.४ मिमी म्हणजेच २४.२ टक्के पाऊस पडला. पुणे विभागात सरासरीच्या १५८.२ मिलिमीटरपैकी ७४.३ म्हणजेच अवघे ४७ टक्के पाऊस पडला आहे. मराठवाड्यात सरासरी १७६.९ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात ५९ मिलिमीटर म्हणजेच अवघे ३३.४ टक्के पाऊस पडला आहे. विदर्भातील अमरावती विभागात सरासरी १६६.७ मिलिमीटरपैकी प्रत्यक्षात ३३.९ म्हणजेच अवघे २०.३ टक्के पाऊस पडला आहे. नागपूर विभागात सरासरी २०९.५ मिलिमीटरपैकी ३७.४ मिलिमीटरपैकी अवघे १७.९ टक्के पाऊस पडला असल्याचे दिसून येते. तेरा दिवसांतील पावसाचा विचार केल्यास कोकण आणि विदर्भात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते.  

४८२ मंडळांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाऊस यंदा सप्टेंबर महिन्यात राज्यातील ४८२ मंडळात २५ टक्के कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. तर ४५९ मंडळात २५ ते ५० टक्के एवढा पाऊस झाला आहे. तर ३४९ मंडळात ५० ते ७५ टक्के, २५६ मंडळात ७५ ते १०० टक्के, ५१९ मंडळात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याचे दिसून येते. 

टक्केवारीनुसार कमी झालेल्या पावसाची जिल्हे ः  ० ते २५ टक्के झालेली पावसाची जिल्हे ः गोंदिया  २५ ते ५० टक्के झालेली पावसाची जिल्हे ः पालघर, नाशिक, जळगाव, नांदेड, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली  ५० ते ७५ टक्के झालेली पावसाची जिल्हे ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, हिगोली, बुलडाणा, नागपूर. ७५ ते १०० टक्के झालेली पावसाची जिल्हे ः धुळे, नंदुरबार, नगर, पुणे, सोलापूर, परभणी,  १०० टक्केहून अधिक पावसाची जिल्हे : सातारा, सांगली, जालना, बीड, उस्मानाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com