उन्हात बागा जगविण्याचे तंत्रज्ञान फळबाग उत्पादकांपर्यंत पोचवा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : तीव्र उन्हामुळे विदर्भात संत्र्यासह इतर फळपिकांचे अस्तित्व धोक्‍यात आल्याचे वृत्त ॲग्रोवनने आठ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे यांनी जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फळबागधारकांकडे जात त्यांना मार्गदर्शन व उपाय योजनांची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.  विदर्भात उन्हाचा पारा सरासरी ४४ ते ४५ अंश सेल्सिअसरवर स्थिरावला आहे. उन्हाची तीव्रता असतानाच भूगर्भातील जलस्त्रोतही दुसरीकडे कोरडे पडले. परिणामी आंबिया बहारातील संत्र्याची गळ होण्यासोबतच संत्रा झाडे वाळण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. संत्र्यासोबतच इतरही फळपिकांना याचा फटका बसत असल्याचे चित्र सद्या सर्वदूर आहे. यावर नियंत्रणासाठी महाऑरेजकडून काडी कचरा व तत्सम आच्छांदनाचा पर्याय वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. सीताफळ उत्पादकांनी बागेला पाणी उपलब्ध असले तरी ते न देण्याचे सीताफळ महासंघाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, ॲग्रोवनमध्ये याविषयी आठ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत कृषी विभागाने तडकाफडकी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडे अशावेळी शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भाने विचारणा केली. त्यासोबतच फळबाग उत्पादकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यापर्यंत तीव्र उन्हाळ्याच्या दिवसात फळबागांची काळजी कशी घ्यावी, याविषयीचे तंत्रज्ञान पोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

गडकरींनी घेतली होती फिरकी विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा बागा आहेत. विदर्भाचे हे मुख्य पीक असताना त्यासाठीचे कोणतेच पूरक आणि उत्पादकता वाढीचे तंत्रज्ञान देण्यात नागपूरातील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेला गेल्या अनेक वर्षात यश आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबाबत सातत्याने नाराजी व्यक्‍त करतात. नागपूर विमानतळावर महाऑरेंजच्या संत्रा विक्री केंद्राचे उद्‌घाटन आठ एप्रिल रोजी गडकरीच्या हस्ते झाले. या वेळी महाऑरेंजच्या स्टॉलवर संत्रा ज्यूसची चव गडकरींनी चाखली. केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया या वेळी उपस्थित असताना त्यांना पाहून गडकरींनी डॉक्‍टर "तुम्हारे संत्रेसे ज्युस कब निकलेंगा'' असे म्हणत त्यांची फिरकी घेतली होती. परंतु, संस्थेचे काम सुधारले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com