agriculture news in Marathi, agrowon, Reach the technology of gardening in the sun to the horticultural growers | Page 2 ||| Agrowon

उन्हात बागा जगविण्याचे तंत्रज्ञान फळबाग उत्पादकांपर्यंत पोचवा

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 मे 2018

नागपूर  : तीव्र उन्हामुळे विदर्भात संत्र्यासह इतर फळपिकांचे अस्तित्व धोक्‍यात आल्याचे वृत्त ॲग्रोवनने आठ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे यांनी जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फळबागधारकांकडे जात त्यांना मार्गदर्शन व उपाय योजनांची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

नागपूर  : तीव्र उन्हामुळे विदर्भात संत्र्यासह इतर फळपिकांचे अस्तित्व धोक्‍यात आल्याचे वृत्त ॲग्रोवनने आठ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे यांनी जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फळबागधारकांकडे जात त्यांना मार्गदर्शन व उपाय योजनांची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

विदर्भात उन्हाचा पारा सरासरी ४४ ते ४५ अंश सेल्सिअसरवर स्थिरावला आहे. उन्हाची तीव्रता असतानाच भूगर्भातील जलस्त्रोतही दुसरीकडे कोरडे पडले. परिणामी आंबिया बहारातील संत्र्याची गळ होण्यासोबतच संत्रा झाडे वाळण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. संत्र्यासोबतच इतरही फळपिकांना याचा फटका बसत असल्याचे चित्र सद्या सर्वदूर आहे. यावर नियंत्रणासाठी महाऑरेजकडून काडी कचरा व तत्सम आच्छांदनाचा पर्याय वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. सीताफळ उत्पादकांनी बागेला पाणी उपलब्ध असले तरी ते न देण्याचे सीताफळ महासंघाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, ॲग्रोवनमध्ये याविषयी आठ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत कृषी विभागाने तडकाफडकी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडे अशावेळी शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भाने विचारणा केली. त्यासोबतच फळबाग उत्पादकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यापर्यंत तीव्र उन्हाळ्याच्या दिवसात फळबागांची काळजी कशी घ्यावी, याविषयीचे तंत्रज्ञान पोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

गडकरींनी घेतली होती फिरकी
विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा बागा आहेत. विदर्भाचे हे मुख्य पीक असताना त्यासाठीचे कोणतेच पूरक आणि उत्पादकता वाढीचे तंत्रज्ञान देण्यात नागपूरातील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेला गेल्या अनेक वर्षात यश आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबाबत सातत्याने नाराजी व्यक्‍त करतात. नागपूर विमानतळावर महाऑरेंजच्या संत्रा विक्री केंद्राचे उद्‌घाटन आठ एप्रिल रोजी गडकरीच्या हस्ते झाले. या वेळी महाऑरेंजच्या स्टॉलवर संत्रा ज्यूसची चव गडकरींनी चाखली. केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया या वेळी उपस्थित असताना त्यांना पाहून गडकरींनी डॉक्‍टर "तुम्हारे संत्रेसे ज्युस कब निकलेंगा'' असे म्हणत त्यांची फिरकी घेतली होती. परंतु, संस्थेचे काम सुधारले नाही. 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...