पाणी पेरून पाण्याचे पीक घ्या : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

अॅग्रोवनचा वाचक हा शेतकरी शास्त्रज्ञच : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
अॅग्रोवनचा वाचक हा शेतकरी शास्त्रज्ञच : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

औरंगाबाद : शेतक-यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम सकाळ अॅग्रोवन अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. औरंगाबाद येथील जबिंदा मैदानावर 'सकाळ अॅग्रोवन'ने आयोजित केलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घघाटन करताना त्या बोलत होत्या. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी उपाध्यक्ष व संचालक के.एम. डीके पाटील, सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, आमदार अतुल सावे, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सतिश नागरे उपस्थित होते.     या प्रदर्शनात देवगिरी महानंद, एमआयटी औरंगाबाद, मे.बी. जी. चितळे अॅन्ड सन्स, बागवानी मिशन, आत्मा, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पशूसंवर्धन विभाग यांचा सहयोग असून अॅन्डस्लाईट, रोहित स्टील वर्क्स हे गिफ्ट पार्टनर तसेच ड्रिम्स क्रिएशन, 92.7 बिग एफएम, ओमेगा क्रिएट यांचा ब्रॅंडिंग पार्टनर म्हणून सहभाग आहे. "अॅग्रोवनशी वाचक म्हणून माझे महाविद्यालयापासून संबंध आहेत. अॅग्रोवनमध्ये पाशा पटेल यांची मुलाखत प्रसिध्द झाली होती. ती त्यांनी मला आनंदाने दाखविली. तो अंक मी उत्सुकतेने पाहिला व त्यात मला  शिरपूर पॅटर्नचा लेख दिसला. या पॅटर्नबाबत मी माहिती घेतली. माझी टीम शिरपूरला पाठविली. तेथूनच जलयुक्त शिवारच्या कामांची पहिली सुरूवात आम्ही केली," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.  "अॅग्रोवनच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर आम्ही 22 भागांमध्ये खोलीकरणाची कामे केली. त्याला आम्ही वैद्यनाथ पॅटर्न असे नाव दिले होते. विशेष म्हणजे या कामांना पुढे अॅग्रोवनने प्रसिध्दी देत आमचे कौतुक केले, अशा शब्दात पंकजाताईंनी जलयुक्त चळवळीतील अॅग्रोवनचे महत्व स्पष्ट केले.  सकाळ समूह आदर्श काम करतो कोणत्याही व्यक्तिकेंद्रित बातम्यांना स्थान न देता सकाळ माध्यम समुह समाजातील आदर्श घडामोडींना डोळ्यासमोर ठेवून भूमिका घेतो. सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मी अनेकवेळा विविध विषयांवर चर्चा करते. अॅग्रोवनची संकल्पना मांडून त्याचे वटवृक्षात रुपांतर करण्याचे काम सकाळने केले आहे. मला या उपक्रमाचे खूप कौतूक वाटते. मुद्रित माध्यमात सकाळकडून केल्या जाणा-या कामकाजाचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा असे मला वाटते, असे गौरवोद्गार पंकजाताईंनी यावेळी काढले.  शेतक-यांसाठी भूमिका घ्या फक्त उत्पादकता वाढली म्हणजे शेतकरी समृध्द होतील असे नाही, हे आजच्याच अॅग्रोवनमध्ये मी वाचले. ते योग्यच आहे. शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा मोलाचा भाग आहे. त्यामुळे सरकारने शेतक-याला सशक्त करणा-या भूमिका खर्चिक असल्या तरी घेतल्या पाहिजे. शेतक-याला प्रशिक्षण मिळावे. आयात निर्यात विषयक निर्णय वेळेत घेण्याची आवश्यकता आहे. प्रक्रिया प्रकल्पांना चालना दिली पाहिजे, असा आग्रह पंकजाताईंनी धरला. अॅग्रोवन कृषी प्रदर्शन उदघाटन सोहळा ( video) तर आत्महत्यांचा आकडा वाढला असता कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी अॅग्रोवनच्या उपक्रमांचे तोंड भरून कौतुक केले. " अॅग्रोवनमधील यशोगाथा हताश शेतक-यांना उभारी देतात. कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाच्या कामकाजाला मनुष्यबळाला मर्यादा येतात. अशावेळी कृषीविषयक ज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रचाराचे मोठे काम अॅग्रोवन करतो. पीकपध्दतील बदल, अभिनव शेतीपुरक उद्योग, आर्थिक उन्नती करणारे प्रयोगशील शेतकरी अशी विविध माहिती अॅग्रोवन देत असल्यामुळे राज्यातील हजारो शेतक-यांना प्रेरणा मिळते. तसे झाले नसते तर शेतकरी आत्महत्यांचा आकडा मोठा दिसला असता, असे उद्धगार कुलगुरूंनी काढले.    दुष्काळाचे वास्तव स्वीकारूः चव्हाण  "राज्याला दुष्काळाची मोठी परंपरा आधीपासूनच आहे. तुकारामच्या वाग्मयातदेखील दुष्काळाचे वर्णन आहे. त्यामुळे यापुढे दुष्काळाशी सामना करावा लागेल. आवडो न आवडो दुष्काळाचे वास्तव स्वीकारूनच पुढे कामे करावी लागतील. यासाठी अॅग्रोवन शेतक-यांच्या सोबत काम करेल," असे प्रतिपादन अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले.  सकाळचे संपादक संजय वरकड म्हणाले की, मराठवाडयातील दुष्काळाशी  सर्व जण जिद्दीने लढत आहेत. या लढाईला साथ देण्यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून सकाळ अॅग्रोवनने यंदा मराठवाडयात कृषी प्रदर्शन भरविले आहे. उद्घघाटनानंतर पंकजा मुंडे यांनी यावेळी प्रदर्शनाला भेट देवून बारकाईने माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अॅग्रोवनचे उपसंपादक अमित गद्रे यांनी केले. नामांकित कृषी संशोधन संस्थांसह या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ड्रीप, टिश्यू कल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे स्टॉल्स असतील. दुष्काळाशी सामना करीत आदर्श शेती, शेती पूरक व्यवसाय व विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीदेखील या वेळी मिळणार आहे. त्यामुळे प्रदर्शनातून एक नवी उमेद देण्याचा प्रयत्न अॅग्रोवन करीत आहे. प्रदर्शनासाठी सर्व दिवस विनामूल्य प्रवेश आहे. 

देशाच्या पशुसंवर्धन क्षेत्रात एक आश्चर्य समजले जाणारा एक टन वजनाचा बैलदेखील शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे. एक हजार किलो वजन, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबीचा हा बैल या प्रदर्शनात सशुल्क बघता येईल.  या उदघाटन सोहळ्याप्रसंगीचे काही क्षणचित्रे...​

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com