कास पठारावरील मोहक रानफुले
कास पठारावरील मोहक रानफुले

कास पठारावरील रानफुलांच्या व्यावसायिक शेतीसाठी संशोधन

भविष्यात चांगले वाण उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीतून निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध हाेतील. -डॉ. के. व्ही. प्रसाद,संचालक, पुष्प संशाेधन संचालनालय

पुणे ः रानफुलांचा अमूल्य ठेवा असलेल्या कास पठारावरील (जि. सातारा) फुलांवर संशाेधन करून, नवनवीन वाण विकसित करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची आखणी सुरू असून, लवकरच तज्ज्ञ, संशाेधक आणि शास्त्रज्ञांचा गट कास पठारचा अभ्यास दाैरा करणार आहे.

या रानफुलांच्या संशाेधनातून निर्माण हाेणाऱ्या वाणांच्या व्यावसायिक विस्तारासाठी या फुलांची शेती करणे शक्य आहे का, यावर वन विभागाच्या सहकार्याने पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने संशाेधन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना पुष्प संशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद म्हणाले, की भारतामध्ये रानफुलांसाठी विशेष हॉटस्पॉट आहे.

या ठिकाणी निसर्गाचा अमूल्य आणि दुर्मिळ ठेवा असून, या विविध फुलांमधील काही आॅर्किड इंग्रज त्यांच्या बराेबर घेऊन गेले व त्यांनी संशाेधन करून तेच वाण पुन्हा भारतात विक्री करत बाजारपेठ उपलब्ध केली. हे करत असताना अनेक दुर्मिळ फूल वनस्पती कमी हाेत गेल्या.

महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट परिसरात विविध रानफुले फुलतात. यामध्ये विशेषतः कास पठारावर विविधरंगी हजाराे जातींची फुले फुलतात. वाढत्या पर्यटनामुळे या फुलांच्या अनेक प्रजातींना धाेका निर्माण झाला आहे. सर्वसमान्य नागरिक, पर्यटक आणि शेतकऱ्यांना या दुर्मिळ ठेव्याचे महत्त्व जाणून देण्याबराेबरच या फुलांवर संशाेधनाचा प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न सुरू आहे.‘‘

निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध होतील येथील विविध फुलांना नागरी भागात स्थापित करण्यासाठी संशाेधन हाती घेण्यात येणार आहे. यासाठी संशाेधकांचा एक गट लवकरच कास पठारला भेट देणार असून, विविध फुलांचे आणि वनस्पतींचे नमुने संकलित करणार आहे.

या वनस्पतींवर संशाेधन संचालनालयात संशाेधन करून याचे व्यावसायिक वाण विकसित करता येतील का, यावरही संशाेधन केले जाणार आहे. ही प्रक्रिया दीर्घकालीन अाहे. भविष्यात चांगले वाण उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीतून निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध हाेतील, असा विश्‍वास डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केला. दुर्मिळ फुलांची काळजी घ्यावी कास पठारवर पर्यटकांना अनिर्बंध वागण्यामुळे दुर्मिळ फुले धाेक्यात आली आहेत. पर्यटकांनी केवळ फुले पाहण्याचा आनंद घ्यावा. फुले, वनस्पती ताेडणी, त्यावर चालणे, लाेळणे असे प्रकार करू नये, असे आवाहन डॉ. प्रसाद यांनी केले आहे. अन्यथा भविष्यात कास पठारवर फुले शिल्लक राहणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. गुलछडी, शेवंतीचे वाण प्रसारित करणार पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने देशभरातील गुलछडीच्या २२, तर शेवंतीच्या विविध रंगांच्या १५० पेक्षा जास्त वाणांवर संशाेधन सुरू आहे. या विविध वाणांचे प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आली असून, पुढील महिन्यात यांना फुले येतील. या वेळी राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांना हे प्रक्षेत्र पाहणीसाठी खुले करण्यात येणार असून, शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध वाण प्रसारित करण्यात येणार आहे, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com