agriculture news in marathi, agrowon, seasonal paisewari status in jalgaon district | Page 2 ||| Agrowon

जळगावमधील १४६७ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांवर
चंद्रकांत जाधव
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पैसेवारीच्या खेळात अनेक गावांमध्ये दुष्काळ असताना त्यांना दुष्काळासंबंधीच्या मदतीपासून वंचित राहावे लागते. अलीकडे तर एका गावात पाऊस पडतो तर त्याला लागून असलेल्या गावात पाऊसच नसतो. गावनिहाय स्थितीचा पावसासंबंधीचा आढावा घेतला जावा.
- कडूअप्पा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.

जळगाव : जिल्ह्यातील १४६७ गावांची हंगामी पैसेवारी ही ५० पैशांवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ही हंगामी पैसेवारी आहे, अद्याप अंतिम पैसेवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे गावांची आकडेवारी किंवा संख्या यात पुढील काळात बदल शक्‍य असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

परंतु जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जानेवारीतच पाणीटंचाई भासेल, त्यामुळे पैसेवारीवर न जाता अधिकाधिक गावांचा समावेश टंचाई आराखड्यात करावा, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कोणत्याच महिन्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. काही गावे अपवाद असतील, परंतु सर्वत्र कपाशी, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांना फटका बसला. आता पैसेवारीचा खेळही चुकीचा दिसतोय. तो शेतकरी व ग्रामस्थांविरोधात जात आहे.

दुष्काळसदृश स्थिती आहे, पण दुष्काळ नाही, असे शाब्दिक खेळ करून शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये. अमळनेर, पाचोरा, पारोळा, जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर असा सर्वत्र पाऊस हव्या त्या वेळी आला नाही. दुबार, तिबार पेरणीची वेळ आली.

जिल्ह्यातील गावांची अंतिम पैसेवारी डिसेंबरमध्ये जाहीर होईल. आता हंगामी पैसेवारीनंतर सुधारित पैसेवारीसंबंधी कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे मिळाली.

५० गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत
जिल्ह्यात केवळ ५० गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. जिल्ह्यात १५०२ गावे असून, यातील केवळ ५० गावे सध्या दुष्काळी स्थितीत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. उर्वरित १४६७ गावांमध्ये आलबेल स्थिती आहे, असा याचा अर्थ नाही, असे यावर शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...