agriculture news in Marathi, agrowon, Service Delivery Bureau in Pune Zilla Parishad | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेत ‘सर्व्हिस डिलिव्हरी ब्युरो’
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे  : जिल्हा परिषदेमध्ये आलेले प्रस्ताव, फायली विनाकारण आडवून ठेवणे यापुढे महागात पडणार आहे. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करताना निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळ सेवा दिली नाही. तर संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला मुदतीनंतर प्रतिदिनी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदमध्ये राज्यात प्रथमच ‘सर्व्हिस डिलेव्हरी ब्युराे’ स्थापन करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.  

पुणे  : जिल्हा परिषदेमध्ये आलेले प्रस्ताव, फायली विनाकारण आडवून ठेवणे यापुढे महागात पडणार आहे. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करताना निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळ सेवा दिली नाही. तर संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला मुदतीनंतर प्रतिदिनी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदमध्ये राज्यात प्रथमच ‘सर्व्हिस डिलेव्हरी ब्युराे’ स्थापन करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.  

जिल्हा परिषदेमध्ये सर्व खात्यांमध्ये आलेल्या फायली व प्रस्तावावर निर्धारित वेळेत कार्यवाही व्हावी. सर्वसामान्यांची अडवणूक थांबवून, विनाकारण होणारा वेळकाढूपणा टाळण्यासाठी मंजूर किंवा नामंजूर असा शेरा मारण्याचे आदेश मांढरे यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशाला सेवा हक्क चा कायद्याचा अाधार देत सर्व प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या महत्वांच्या सेवांसह १०० सेवांची निवड करून त्या सेवांची पूर्तता करण्यासाठी कालावधी निश्‍चित केला जाईल. 

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात फलकावर याची माहिती उपलब्ध असेल. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची कार्यवाही केली जाणार आहे. एखादे काम किती दिवसांत पूर्ण होईल याचा कालावधी निश्‍चित केला जाईल. त्यानंतरही सेवा पूर्ण झाली नाही, तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी पाच हजार रुपये दंड आकारणी केली जाईल. ही दंडाची रक्कम पगारातून कापून न घेता कर्मचाऱ्याला रोख भरावी लागले. जिल्हा परिषदेत कामासाठी पैशाची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन मांढरे यांनी केले आहे.  

सर्व्हिस डिलिव्हरी ब्युरोची रचना
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाप्रमाणे सर्व्हिस डिलेव्हरी ब्युरो स्थापना 
-  ब्युरोमध्ये अ वर्ग अधिकारी, ब वर्ग अधिकारी आणि कनिष्ठ सहायक यांचा समावेश 
- प्रथम प्रत्येक विभागात सेवेचा कालावधी निर्धारित करणार 
- प्रलंबित प्रस्ताव, अर्ज, फाईल पेंडींग त्याची तक्रार ब्युरोकडे नोंदविता येणार
- तक्रारीचे तातडीने निरकरण करून संबंधिताला दंड करण्याचे अधिकार
- तक्रारदाराला ऑनलाईन तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देणार

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...