agriculture news in marathi, agrowon smart awards 2019 application process starts | Agrowon

‘ॲग्रोवन स्मार्ट ॲवार्डस : २०१९' साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना यंदाही ॲग्रोवन स्मार्ट ॲवार्डस देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारांचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून राज्यस्तरीय आठ व विभागीय पाच गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातील. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०१९ आहे.

पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना यंदाही ॲग्रोवन स्मार्ट ॲवार्डस देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारांचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून राज्यस्तरीय आठ व विभागीय पाच गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातील. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०१९ आहे.

राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. तसेच ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी या पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपल्या धडपडीतून पुन्हा उभं करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यासाठी आहे. तसेच ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार, ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय, ॲग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण) विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे.

यंदापासून दोन नवे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ॲग्रोवनने २०१९ हे जलव्यवस्थापन वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी हा पुरस्कार दिला जाईल. कमी पाण्यात उत्तम शेतीचे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार असेल. ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी हा पुरस्कारही देण्यात येणार आहे. आपल्या शेतीमध्ये शास्त्रीय प्रयोग व संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार आहे. विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे.

या पुरस्कारांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली त्रयस्थ निवड समिती प्राप्त प्रस्तावांची छाननी करून विजेत्यांची निवड करणार आहे. हा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल. पुणे येथे शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

असे पाठवा प्रस्तावः

  • राज्यातील कोणीही व्यक्ती स्वतःचा किंवा परिचितांचा प्रस्ताव पाठवू शकते.
  • प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी, २०१९ आहे.
  • प्रस्ताव फक्त दोन पानी असावा. त्यात संबंधिताचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्र, कार्याची माहिती, वेगळेपण व इतर तपशील नमूद करावेत. याआधी मिळालेल्या पुरस्कारांचीही माहिती द्यावी.
  • प्रस्तावावर तो कोणत्या गटातील पुरस्कारासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.
  • अतिरिक्त माहिती, अन्य तपशील, छायाचित्रे प्रस्तावासोबत जोडता येईल
  • एका व्यक्तीला एकाच पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविता येईल. अधिकचे प्रस्ताव बाद करण्यात येतील.

प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता :
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डस,
ॲग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स प्रा. लि.,
५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२
- ई मेल : agrowonawards@esakal.com


इतर अॅग्रो विशेष
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...