agriculture news in marathi, agrowon smart awards distribution ceremony, pune, maharashtra | Agrowon

शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा उद्या सन्मान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 मे 2019

पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्डस प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. 

पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्डस प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. 

पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात दुपारी साडेचार वाजता होणाऱ्या या रंगतदार पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार शर्वरी जमेनीस, भार्गवी चिरमुले, स्मिता शेवाळे, मंगेश बोरगावकर, सावनी रवींद्र आदी आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे विजयश्री इव्हेंटस्‌ हे प्रस्तुतकर्ते आहेत.

काळ्या माती राबणाऱ्या हातांना पुरस्काराचाही स्पर्श आणि पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे पाहिजे, अशी भूमिका ठेवत अॅग्रोवन परिवाराने सुरू केलेल्या स्मार्ट अॅवार्डस वितरण परंपरेचे हे तिसरे वर्ष आहे. अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्डसकडे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. सर्वांसाठी निःशुल्क असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे प्रायोजक रिहुलीस, निरामय अॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, बोअर चार्जर, महारयत अॅग्रो इंडिया, सिस्टिमा बायो, मारुती सुझुकी सुपर कॅरी हे आहेत.

यंदाचे अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड एकूण १३ श्रेणींमध्ये दिले जात आहेत. या पुरस्कारांसाठी राज्यभरातून प्रस्ताव आले होते.  तज्ज्ञांच्या समावेश असलेल्या निवड समितीकडून या प्रस्तावांची छाननी व निवड करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. प्रत्येकी २५ हजारांचा अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार या वेळी दिला जाईल. 

यंदा ‘अॅग्रोवन’कडून ‘जलव्यवस्थापन वर्ष’ साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने प्रथमच ‘स्मार्ट जलव्यवस्थापक पुरस्कार’ दिला जाणार आहे. याशिवाय ‘अॅग्रोवन स्मार्ट संशोधक पुरस्कार’ देखील संशोधक वृत्तीने शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला दिला जात आहे. सेंद्रिय शेतीत कर्तृत्व गाजवलेल्या शेतकऱ्याला ‘अॅग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार’ दिला जाईल. याशिवाय अॅग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार, अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण) विजेत्या शेतकऱ्यांना प्रत्येक दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र दिले जाणार आहे.


इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...