सोयाबीनला कीड,रोगांनी पोखरले

पावसाने दडी मारली त्या काळात सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीने हल्ला केला. या कालावधीत फुले, शेंगा पूर्णपणे अळीने फस्त केल्यामुळे अशी स्थिती झाली.
 सुकळी पैसाडी येथील गोपाल येवतकार या शेतकऱ्याने ५ एकरांतील सोयाबीनचे पीक शेंगा लागल्या नसल्याने रविवारी (ता. ३) रोटा व्हेटरने वखरले
सुकळी पैसाडी येथील गोपाल येवतकार या शेतकऱ्याने ५ एकरांतील सोयाबीनचे पीक शेंगा लागल्या नसल्याने रविवारी (ता. ३) रोटा व्हेटरने वखरले

अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या सोयाबीनपैकी सुमारे अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्र विविध कीड व रोगांनी पोखरले अाहे. पावसाचा लहरीपणा आणि सततचा खंड, यामुळे पिकाच्या वाढीवर तसेच फूलधारणेवर परिणाम झालेला आहे. याचा थेट फटका उत्पादन आणि उत्पादकतेला बसण्याची शक्यता अाहे. किमान ३५ ते ४० टक्के उत्पादन घटीची शक्यता असून, अाता किडींचा जोर वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

विदर्भ, मराठवाड्यात तसेच खानदेशातही सोयाबीनने घट्ट पाय रोवले अाहेत. राज्यात २०१६-१७ मधील खरीप हंगामात ३९.७६ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली होती. तर ४६.१६ लाख टनांपर्यंत उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामातही मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड झालेली अाहे. मात्र अनेक भागात सोयाबीनला फुलोरा, शेंगा नसल्याच्या तक्रारी येत अाहेत.  विदर्भातील बऱ्याच तालुक्यांत ही स्थिती समोर अाली आहे. पावसाने दडी मारली त्या काळात सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीने हल्ला केला. या कालावधीत फुले, शेंगा पूर्णपणे अळीने फस्त केल्यामुळे अशी स्थिती झाली. गेल्या अाठवड्यात अालेल्या पावसानंतर सोयाबीनवर खोडकीड व शेंगेवरील करपा रोग मोठ्या प्रमाणावर पसरला अाहे. आता पाऊस आला नाही तर बरेच नुकसान होऊ शकते, असा अंदाज कृषी खात्याचे अधिकारी वर्तवित अाहेत. जेथे शेंगा पूर्णतः खाल्ल्या गेल्या तेथे पाऊस पडल्यामुळे थोडाफार पुनर्बहार सुरू झाला आहे. पण पाऊस कमी असल्यामुळे पूर्वीसारखे ऊत्पादन येईल की नाही याची कुठलीही शाश्वती नाही.  या मोसमात मागील तीन महिन्यांचा विचार केला तर दर अाठ ते दहा दिवसांनी खंड पडला. या खंडाचा कालावधी कुठे २० तर कुठे २५ दिवसांपेक्षा अधिक पावसात खंड यामुळे या खरिपात मूग, उडदाला मोठा फटका बसला.  मागील हंगामात खरिपात सर्वाधिक पेरणी सोयाबीची झाली होती. परंतु, बाजारपेठेत दर कोसळल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. त्यामुळे यंदा सोयाबीनपेक्षा इतर खरीप पिकांची पेरणी करण्यावर शेतकरी भर देतील, असे अपेक्षा जाणकारांनी वेळोवेळी व्यक्त केली. मात्र, याहीवेळी सोयाबीन पिकावरच शेतकऱ्यांनी विश्वास दर्शविला. पावसाच्या लहरीपणामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे पिकांचा काळ मागे-पुढे झाला. कुठे सोयाबीन शेंगा परिपक्व होण्याच्या तर कुठे फूलधारणेच्या अवस्थेत दिसून येत अाहे. फूलधारणा अवस्थेत पावसाने हजेरी लावल्याने चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा अाता व्यक्त केली जात अाहे. मात्र रोग-किडीचा हल्ला लक्षात घेता संरक्षण आणि व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे. ढगाळ वातावरण प्रादुर्भावासाठी पोषक शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नुकसानीची शक्यताच अधिक अाहे. सुरवातीला लहान अळी सोयाबीनची कोवळी पाने खाते. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळ्या, फुलांचे नुकसान करते. शेंगांना मोठे छिद्र पाडून दाणा खाऊन टाकते. ढगाळ वातावरण प्रादुर्भावासाठी पोषक ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित परीक्षण व संरक्षित व्यवस्थापन करण्याची सूचना अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केली अाहे. असे करा व्यवस्थापन

  • पीक तणमुक्त ठेवावे, बांधावरील किडीच्या पूरक वनस्पतीचा नाश करावा.
  • शेतात ठिकठिकाणी पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दीड फूट उंचीचे पक्षी थांबे उभारावेत.
  • शेतात हेक्टरी किमान ५ ते १० कामगंध सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावेत.
  • शेंगअळीचा प्रादुर्भाव लक्षणीय असल्यास जैविक कीटकनाशकांची तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.
  • आवश्यकता भासल्यास परत १० ते १२ दिवसांनी फवारणी करावी.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com