सोयाबीनला शेंगाच न लागल्याने शेतकरी अडचणीत

आमच्या शेतातील १५ एकरांतील सोयाबीन पिकाला शेंगाच लागलेल्या नाहीत. मशागत, लागवड, बियाणे, खते यावर मोठा खर्च झाला. आता पिकाला काहीच येणार नसल्याने नुकसान झाले आहे. डोक्‍यावरील कर्ज कसे फेडावे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. - आदिनाथ गंगावणे, शेतकरी, भर जहाँगीर, ता. रिसोड, जि. वाशीम.
सोयाबीनला शेंगाच नाही
सोयाबीनला शेंगाच नाही

वाशीम : जिल्ह्यात या हंगामात विविध गावांमध्ये सोयाबीनचे पीक संकटात सापडले आहे. रिसोड तालुक्‍यात विविध गावांसह भर जहाँगीर येथील शिवारात सोयाबीन पिकाला शेंगाच लागलेल्या नसून आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या गावातील २५ शेतकऱ्यांचे जवळपास ६० हेक्‍टरमधील सोयाबीन हिरवेगार असले, तरी त्याला शेंगाच नसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

सोयाबीनची पेरणी करून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या काळात अनेकदा पावसाने दडी मारल्याने व किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनला शेंगाच लागलेल्या नाहीत. यामुळे झालेल्या नुकसानाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्वेक्षण करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

गावातील महादजी गंगावणे, प्रभाकर गंगावणे, रमेश गंगावणे, राधाकिसन गंगावणे, देवबा सानप, भगवान सानप, वामनराव गरकळ, महादा सानप, बाबाराव सानप, विलास सानप, विठ्ठल सानप, लक्ष्मण सानप, अशोक फड, दिनकर जायभाये, मधुकर जायभाये, प्रल्हाद जायभाये, गजानन गायभाये, प्रा. पंढरीनाथ चोपडे, दत्ता गरकळ, आदिनाथ गंगावणे, रंगनाथ सानप या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या नसल्याने लागवडीचा खर्चही निघण्याची शक्‍यता नाही.

काही ठिकाणी सोयाबीन पिकाला शेंगा नसल्याचा प्रकार घडलेला आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीन फुलोरावस्थेत असताना पाण्याचा ताण आणि या वेळी आलेल्या किडीकडे दुर्लक्ष झाल्याने शेंगाच लागलेल्या नसल्याचे कारण तज्ज्ञांकडून दिले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com