agriculture news in marathi agrowon special article on effect of lock down on indian economy | Page 2 ||| Agrowon

महामारी, महामंदी अन् महासत्ता

 अभय कुलकर्णी-
गुरुवार, 16 एप्रिल 2020

भविष्यात आर्थिक महामंदी येणारच हे नक्की आहे व त्यात भारताला देखील सामोरे जावे लागेल हे ही नक्की. मग या महामंदीवर भारत देश कोणत्या उपाययोजना करेल हा देखील पुढील खूप जटील प्रश्‍न आहे. आज या महामारीच्या संकटातून एक नक्की सिद्ध झाले की भारताला येणाऱ्या पुढील काळात आर्थिक मंदीतून बाहेर काढणारे एकच क्षेत्र आहे ते म्हणजे कृषी.
 

गेल्या काही दिवसांपासून कित्येक वेळा, सतत आपल्या सर्वांच्या कानावर कोरोना हा शब्द पडत आहे. या कोरोनापुढे भारतच नव्हे तर जगातील बलाढ्य देशांनी देखील हात टेकले आहेत. अमेरिकेने तर चीनवर सरळ आरोपच ठेवला की हा कोरोना व्हॉयरस तुमच्यामुळेच अमेरिकेत पसरला आहे. तसेच दोन महासत्तामध्ये या कोरोना विषाणूच्या माध्यमाने जगावर कोण वर्चस्व ठेवेल याची देखील चढाओढ सुरु झाली आहे. आता तर या कोरोना रोगामुळे संपूर्ण जग हे लॉकडाउन झाले. त्यामुळे प्रत्येक देशाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होत आहे. यास भारत देश देखील अपवाद नाही आहे. आज भारतात कोरोना विषाणूमुळे मृत्यु पडणाऱ्यांची संख्या जरी कमी असली तरी भारतातील असलेल्या प्रचंड लोकसंख्येमुळे हा कोरोना पुढे काय प्रकोप करेल? किंवा लवकर नियंत्रणात येऊ शकेल काय? हा येणारा काळच ठरवेल.

गेल्या काही महिन्यांपासून भारतात नव्हे तर संपूर्ण जगात एक आर्थिक मंदीची लाट आलेली होती. त्यातच कोरोनाच्या महामारीमुळे येणाऱ्या पुढील तीन महिन्यानंतर जी वैश्‍विक आर्थिक मंदी येणार आहे त्याला हे जग कसे तोंड देईल याचे उत्तर सध्या जगात कोणत्याच देशाकडे नसावे असे मला वाटते. कारण सध्या या महामारीला कसे तोंड द्यायचे हाच आपल्यापुढे एक मोठा प्रश्‍न आहे. आज जे पुढील तीन महिन्यांचे भारत सरकार नी पॅकेज जाहीर केले आहे, त्यावरुन हा लॉकडाउन एकवीस दिवसांच्यावर जाणार आहे, असे वाटत होते आणि घडलेही तसेच. आज भारत देशाचे सरकार, राज्य सरकारे, डॉक्‍टर्स हे सर्व जण कोरोनाबाधीत रुग्णांवर प्रयत्नांची शिकस्त करुन उपचार करतच आहे. तसेच भारतातील संपूर्ण जनतेनी विशेष काळजी घेतल्यास आपल्या देशातून आपण फार लवकर कोरोनाला हरवू अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही.

आज भारत ज्या आत्मविश्‍वासाने या महामारीला सामोरे जात आहे त्याचे एकच कारण आहे. ते म्हणजे भारताकडे सध्याच्या परिस्थितीत विपुल प्रमाणात असलेला जीवनावश्‍यक वस्तूंचा तसेच अन्नधान्याचा साठा. यामुळेच कोरोना महामारीच्या संकटात भारतातील प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस घरात बसलेला आहे अशा प्रत्येकाला भारत देशाकडे असलेला अन्नधान्याच्या साठ्यामिुळे नक्कीच दिलासा मिळालेला आहे. कारण अन्न हेच पुर्णब्रह्म आणि अन्न नसेल तर दाही दिशा फिरावे लागते हेच आजचे आपल्या पुढील सत्य आहे. आणि म्हणूनच आज इतक्‍या कठीण समयी जे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या करिता विपुल प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन ठेवलेले आहे त्या तमाम भारतीय शेतकऱ्यांना या भीषण महामारीच्या संकटात आपण विसरता कामा नये.

भविष्यात आर्थिक महामंदी येणारच हे नक्की आहे व त्यात भारताला देखील सामोरे जावे लागेल हे ही नक्की. मग या महामंदीवर भारत देश कोणत्या उपाययोजना करेल हा देखील पुढील खूप जटील प्रश्‍न आहे. आज या महामारीच्या संकटातून एक नक्की सिद्ध झाले की भारताला येणाऱ्या पुढील काळात आर्थिक मंदीतून बाहेर काढणारे एकच क्षेत्र आहे ते म्हणजे कृषी. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत सरकारला आपले सर्वात जास्त लक्ष कृषी क्षेत्रावरच केंद्रीत करण्याची गरज आहे. ज्या वेळेस भारतात मोगल, निजाम, बाबर यांनी जे आक्रमणे केली तसेच ब्रिटीश व डच लोकांनी जी भारतावर नजर पडली ती भारताच्या सुपीक, काळी, मध्यम, हलकी अगदी दलदलीची किंवा खारपाण पट्ट्यातील जमिनीतून मिळणाऱ्या देखील मिळणाऱ्या भरपूर कृषी उत्पादनामुळे विस्तृत अशा नटलेल्या नैसर्गिक वनराईमुळे व अमाप खनिज धातूच्या संपत्तीमुळे, संपन्न अशा गोधनामुळे!

आजच्या परिस्थितीत भारतातील सर्वात दुर्लक्षित कोणते क्षेत्र असेल तर ते कृषी क्षेत्र आहे. कृषीकरिता अर्थसंकल्पात पाहिजे तशी तरतुद केली जात नाही. तरी देखील आज भारतातील कृषी क्षेत्र जे काही तग धरुन आहे ते फक्त शेतकऱ्यांच्या हिंमतीवर आहे. म्हणूनच येणाऱ्या पुढील काळात भारत सरकारने गांभिर्यपूर्वक विचार करुन कृषी क्षेत्राला झुकते माप द्यायला पाहिजे. असे केले तरच येत्या तीन-चार वर्षात भारत महामंदीतून बाहेर निघेल.

आज आपण शेतीमध्ये अमाप रासायनिक किटकनाशकांचा वापर करीत आहोत. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. परदेशातून आयात केलेल्या बियाण्यांची जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवड होताना दिसत आहे. या बियाण्यातून विविध तणांचा प्रसार होत आहे. व या तणांचा नायनाट करण्याकरिता महागड्या, अति जहाल तणनाशकाचा वापर शेतात होत असतांना दिसत आहे. परंतू भारतातील शेतकऱ्यांना या रासायनिक निविष्ठांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीचा अवलंब करावाच लागेल. तसेच यापुढे भारताची स्वावलंबी कृषी प्रधान देश म्हणून ओळख निर्माण करणे ही आता काळाची गरज झालेली आहे. कारण जे भारताकडे आहे ते आज कोणत्याच देशाकडे उपलब्ध नाही. उदाहरणार्थ आज भारतातील गोधन जरी झपाट्याने कमी झाले असले तरी भारताला देशी गोधनाची देणगी लाभलेली आहे. जर आता ग्रामीण भागात प्रत्येक घरी एक जरी देशी गाय पाळली तरी भारतातील गोधन झपाट्याने वाढण्यास सुरुवात होईल. गाईंच्या शेणामध्ये नत्र, स्फुरद, पालाश तसेच अनेक सुक्ष्म अन्नद्रव्ये असल्यामुळे ज्या जमीनींचा रासायनिक खते व किटकनाशकामुळे पोत गेलेला आहे तो पोत शेणखताच्या वापरामुळे परत मिळवता येऊ शकतो. तसेच विषमुक्त शेतीला सरकारकडून मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्यास भारत संपूर्ण देशांना विषमुक्त अन्नधान्य पुरवठा करणारा एकमेव देश म्हणून गणला जाईल. आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन भारताला मिळेल.
थोडक्‍यात भविष्यात येणाऱ्या आर्थिक महामंदीच्या भक्कत ताकदीने सामना करायचा असल्यास भारताने शेती व कृषी व्यवसायाला राष्ट्रीय उद्योग म्हणून घोषित करावे. तसेच विदेशातील बी बियाणे तसेच रासायनिक किटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद करुन विषमुक्त शेती करण्यास चालना दिल्यास नक्कीच भारत हा अन्नधान्य संपन्न व जगातील एक नंबरची महासत्ता बनेल हे निश्‍चित

 अभय कुलकर्णी- - ९६६५७५९६७९
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
--------------------


इतर संपादकीय
धमक्या नको; हवा व्यवस्था बदलअनेक राष्ट्रीयीकृत बॅंका कर्ज देण्यासाठी टाळाटाळ...
बांधावरच्या तरुणाईला गरज स्व-संवादाची!अभिनेता सुशांतसिंह राजपूतने नुकताच टोकाचा निर्णय...
आरोग्य निर्भरतेसाठी पशुधन गाळतेय ‘लाळ’ राज्यात पशुरोग निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा...
राजर्षींचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य दोन एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर...
आपत्ती शिकविते नियोजनप्रभावी विस्तार शिक्षण यंत्रणा नसल्याने शाश्वत...
सडेवाडीचा आदर्शया वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
शेतकऱ्यांना हवी थेट आर्थिक मदतकोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेमधून...
दुबार पेरणीस शेतकऱ्यांना उभे करा राज्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक...
श्रमाचा बांध  ऐन पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यानंतर...
पर्यटन पंढरीचा ‘निसर्ग’  निसर्ग आणि कोकण यांचे अतिशय जवळचे नाते आहे....
सुधारित तंत्रा’चा सरळ मार्ग  आपल्या देशात एचटीबीटी कापूस, बीटी वांगे, जीएम (...