agriculture news in marathi agrowon special article on negligence of bee keeping in India | Agrowon

उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच!

डॉ. भास्कर गायकवाड 
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पीक उत्पादनवाढ तसेच मधासह अन्य उपयुक्त उत्पादनात मधमाश्यांचा वाटा मोठा आहे. परंतु, आपल्या राज्यात मधुमक्षिकापालनाला म्हणावी तशी चालना मिळालीच नाही. मधुमक्षिकापालन व्यवसायाबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना करून देण्याच्या हेतूने पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे आजपासून मधुक्रांती-२०१९ प्रदर्शन आणि परिसंवादास सुरवात होत आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख...         
 

मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार, कार्यक्षम, शिस्तबद्ध आणि शेती, निसर्ग, मानवाला उपयुक्त असा सजीव आहे. निसर्गामध्ये जवळजवळ ७५ हजार कीटकांच्या प्रजाती असून, काही कीटक मानवाला तसेच शेतीला उपयुक्त, तर काही कीटक त्रासदायक आहेत. अनेक कीटक वनस्पतींना त्रासदायक असतात. त्यांच्यापासून फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. अशा कीटकांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त कीटक असतात. अशा प्रकारे शत्रुकीटक, मित्रकीटक अशा दोन वर्गांमध्ये कीटकांचे विभाजन होते. मधमाशीचा विचार केला, तर ती कोणत्याही प्राणिमात्राला, वनस्पतीला घातक नाही. मधमाशी वनस्पतीवर आपला उदरनिर्वाह करत असेल, तरीही ती वनस्पतींना त्यांचे उत्पादन आणि प्रजनन वाढविण्यास मदत करते. म्हणजेच वनस्पती आणि मधमाशी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने राहतात. वनस्पतीमधील परागकणांचे वहन करून संकर होण्यास मदत करण्याचे काम मधमाश्या करतात. वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात परागकण आणि मध असते. त्यापैकी वनस्पतीच्या उत्पादनात किंवा दैनंदिन कार्यपद्धतीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशा स्वरूपात मधमाश्‍या वनस्पतीकडून परागकण आणि मध देतात. ही सर्व प्रक्रिया इतक्‍या सहज सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालू असते आणि हे सर्व बघितल्यानंतर निसर्गाने मधमाश्‍यांना का तयार केले असेल याचे उत्तर सहजपणे मिळते. मधमाश्या परागकण आणि मध घेऊन आपल्या प्रजातींची संख्या वाढवते, त्यांची कार्यक्षमता वाढविते. याचबरोबर मधमाश्यांपासून अत्यंत मधुर असे मध, मेण, परागकण यांसारखे उपयुक्त पदार्थ मानवाला मिळतात. कोणताही खर्च न करता शेतीचे उत्पादन वाढवून देणारा आणि त्याचबरोबर मध, मेण, परागकण इत्यादी पदार्थ देणारी ही मधमाशी आजच्या प्रगत युगामध्ये नष्ट होत आहे, ही अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी बाब आहे. परागीकरणासाठी निसर्गात मधमाशी सोडून कोणताही प्राणी, कीटक तयार केलेला नाही आणि तो कीटक नष्ट झाला तर शेतीचे काय होईल, याचा विचार न केलेलाच बरा!

मधमाशीचा इतिहास
भारतातील प्राचीन वेद आणि बुद्धकाळामध्ये तसेच प्राचीन काळातील विविध दगडांवरील पेंटिंग्जद्वारे मधमाशीचा संदर्भ दिसून आलेला आहे. रामायणामध्येही मधमाशीचा उल्लेख आढळतो. सुग्रीव राजाने मधुबनाची निर्मिती खास मधुमक्षिकापालन करून त्यापासून मधाचे उत्पादन तयार करण्यासाठी केली होती. तसेच जंगलामध्ये आणि शेतीच्या बांधावरील झाडांवर मोठ्या प्रमाणात मधमाश्‍यांचे पोळे दिसत होते. या पोळ्यांपासून मध गोळा करून त्याची विक्री केली जात असे. आदिवासी समाज जंगलामधून मध गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करीत आणि त्यापासून त्यांना चांगला रोजगारही मिळत होता. अर्थात या प्रकारचे मध काढण्याची पद्धत अत्यंत अशास्त्रीय होती. मधमाश्यांचे पोळे पिळून त्यातून मध बाहेर काढला जात असे. यामुळे मधामध्ये मधमाश्‍या, त्यांची अंडी तसेच मधमाश्‍यांनी आणलेले परागकण हे सर्व मिसळले जात होते. त्यामुळे मधाची प्रत कमी होऊन मध लवकर खराब होत असे. जगामध्ये मधुमक्षिका पालनासाठीचे अनेक प्रयत्न ११-१२ व्या शतकापासून सुरू झाले होते. १५०० ते १८५१ हा कालखंड जगामध्ये मधमाशीचा अभ्यास करून त्यातील प्रत्येकाचे कार्य जीवनशैली आणि उत्पादन यांचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न झाला. त्यानंतरच खऱ्या अर्थाने शास्त्रीय पद्धतीत आधुनिक मधुमक्षिका पालनाचा कालखंड सुरू झाला. भारतामध्ये १८८२ मध्ये पहिल्यांदा बंगालच्या प्रदेशात पेट्यांमध्ये मधुमक्षिका पालनाचा प्रयोग झाला. तसेच पंजाबमध्येही १८८३-८४ मध्ये यावर प्रयोग केले. परंतु, त्याला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. एकोणिसाव्या शतकातील दुसऱ्या, तिसऱ्या दशकामध्ये मधमाशीपालनाला गती मिळाली. रॉयल कमिशन ऑफ अॅग्रीकल्चर यांनी १९२८ मध्ये ग्रामीण भागातील कुटीर उद्योगांसाठी मधुमक्षिकापालनाला प्रोत्साहन दिले. मद्रास, पंजाब, कुर्ग (कर्नाटक) आणि उत्तर प्रदेश या प्रांतांमध्ये मधमाशीपालनाला प्रोत्साहन देऊन तेथे हा व्यवसाय सुरू झाला. इतर प्रांतांमध्ये मात्र मधुमक्षिकापालनाचा गांभीर्याने विचार केला नाही. आजही देशांमध्ये हेच प्रांत मधुमक्षिका पालनासाठी आघाडीवर आहेत. या प्रांतातील सर्व मधुमक्षिका उत्पादकांना देश पातळीवरील मधुमक्षिका पालनाचा संघ १९३८ मध्ये स्थापन केला आणि या संघाचे काम आजही सुरू आहे. 

भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी १९४५ मध्ये पंजाब येथे तर १९५१ मध्ये कोईमतूर, तमिळनाडू येथे मधमाश्यांवर संशोधन केंद्र सुरू केले. तसेच खादी आणि ग्रामोद्योग केंद्राच्या वतीने पुणे येथे १९८२ मध्ये राष्ट्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्राची स्थापना केली. देशामध्ये मधुमक्षिकापालनाला चालना मिळण्यासाठी अनेक विकास कार्यक्रम स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये राबविण्यात आले. विशेषतः १९५३ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग केंद्राची स्थापना करून या प्रकल्पात मधुमक्षिका पालनाचा अंतर्भाव केल्यामुळे या व्यवसायाला देशामध्ये चालना मिळाली. आज भारतातील दक्षिण भारत विशेषतः तमिळनाडू, केरळ, कर्नाटक तसेच उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, राजस्थान, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये मधुमक्षिकापालन चांगल्या पद्धतीने स्थिरस्थावर झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिकापालनाला फार मोठी संधी असूनही पूर्वीपासूनच या व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेले आहे. 

डॉ. भास्कर गायकवाड  ः ९८२२५१९२६०
(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)


इतर अॅग्रो विशेष
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....
कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात वेगाने;...नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात...
कर्जापोटी दंडव्याज नको; केंद्राकडून...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायनांची...नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर द्राक्षाच्या मागणी व...
मार्चअखेर बारा हजार कोटींची कर्जमाफी;...मुंबई : ठाकरे सरकारने जाहिर केलेल्या महात्मा फुले...
पुणे जिल्हा बॅंकेने तीन टक्के व्याजाची...पुणे : केंद्र सरकारने पीककर्ज फेडीची मुदत ३१...
मराठवाडा, विदर्भात ‘पुर्वमोसमी’चा दणका...पुणे : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
बाहेरून येणारे दुधाचे टँकर अडवण्याचे...कोल्हापूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
सोलापुरातून द्राक्षांचे दोन कंटेनर...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट...पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील...
मराठवाड्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व...
उन्हाच्या चटक्याने मालेगाव होरपळलेपुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरू...
बेशिस्त म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध...मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३०२; २३...मुंबई : मंगळवारी (ता.३१) एकाच दिवशी तब्बल ८२ नवीन...
मुंबई बाजार समितीत पोलिसांच्या मदतीने ‘...मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार...
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना ...पुणे : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर...
समन्वय साधत नगर बाजार समिती सुरूनगर ः प्रयत्न करुनही गर्दी कमी होत नसल्याने...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे: उन्हाच्या झळा वाढू लागल्याने राज्याच्या...
सीसीआयला केंद्राकडून १०५९ कोटींचा...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक...