agriculture news in marathi agrowon special article on special economic status to grape part 2 | Agrowon

द्राक्ष पिकाला हवा विशेष दर्जा

कृषिरत्न अनिल मेहेर
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राज्यामध्ये सर्व द्राक्ष बागायतदारांपर्यंत पोचलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाशी समन्वय साधून द्राक्ष बोर्डाची स्थापना झाल्यास द्राक्ष उत्पादकांचे प्रश्‍न, अडचणी यांचे निराकरण होईल. द्राक्ष शेतीस स्थैर्य प्राप्त होईल, अशी मला आशा वाटते. 
 

द्राक्ष शेतीचे महत्त्व आणि त्यावरील अडचणींचा व उपायांचा आढावा घेता द्राक्षाची सद्यस्थिती बदलेल, असे वाटत नाही. म्हणूनच या पलीकडे जाऊन द्राक्षपिकाला ‘स्पेशल इकॉनॉमिक क्रॉप’चा दर्जा देणे आवश्‍यक ठरेल. यामुळे सध्या विशेष आर्थिक विभाग (एसईझेड) असे जे मॉडेल गुंतवणुकीस वाढ करण्याच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने वा निर्यात वाढ करण्याच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट असे समजले जाते, तसेच मॉडेल द्राक्षपिकासाठी लागू होऊन या पिकाला विशेष दर्जा प्राप्त होऊ शकेल. यामुळे द्राक्षशेतीत झपाट्याने वाढ होऊन ती देशाच्या, राज्याच्या सर्व अंतर्भूत घटकांच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक वाढीसाठी पोषक अशीच ठरू शकेल. 

का हवा विशेष दर्जा?
हवामानातील बदल त्यामुळे वारंवार होणारे नुकसान, द्राक्ष बागायतदारावरचे वाढते कर्ज, क्षेत्र वाढीऐवजी त्यात होणारी घट, घटते उत्पन्न यामुळे रोजगार निर्मितीवर होणारा परिणाम, कमी निर्यात, घटते परकीय चलन हे सर्व परिणाम कमी होऊन द्राक्षशेतीस स्थैर्यता प्राप्त होण्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे. यासाठी पुरेसे सरकारी पाठबळ असणे आवश्‍यक आहे. 

द्राक्ष शेतीमुळे सरकारला होणारे फायदे 
 रोजगार निर्माण झाल्याने बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होते. साधारणपणे एक एकर द्राक्षबाग वर्षभरात ३५० दिवसांचा मजुरांचा रोजगार उपलब्ध करते. 
 द्राक्ष बागायतीमुळे इतर पिकांपेक्षा जास्त शेतपट्टी महसूल खात्यास मिळते. 
 द्राक्षशेतीस जास्तीत जास्त निविष्ठा लागत असल्यामुळे ते निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे उत्पादन वाढेल, व्यापार वाढेल, पर्यायाने सरकारला जास्तीत जास्त टॅक्‍स मिळेल. 
 द्राक्षाचा निर्यातीतील वाटा एकूण शेतमालाच्या निर्यातीच्या ३.३८ टक्के असून तो द्राक्षशेतीत वाढ झाल्यास पाच टक्के पर्यंत जाऊ शकेल. सध्या जे परकीय चलन मिळत आहे, त्यामुळे अधिकचे परकीय चलन मिळेल. पर्यायाने सरकारला परकीय चलन प्रबंध करताना जो त्रास होतो तो कमी होईल. 
 द्राक्षशेतीत वाढ झाल्याने त्यावर अवलंबून असलेले मनुके, ज्यूस, वाईन या उद्योगांची भरभराट होईल. त्यामुळे पर्यटकांकरिता पूरक वातावरण तयार होईल. पर्यायाने ह्या क्षेत्रापासून मिळणारे सर्व टॅक्‍सचे उत्पादन सरकारला मिळू शकेल. त्याचा फायदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी निश्‍चित होऊ शकतो. 

 बॅंक क्षेत्रात ह्या पिकास स्थैर्य नसल्याने कर्ज मंजूर वा वितरण करताना जी भीती निर्माण झालेली आहे, ती भीती सरकारचा पाठिंबा मिळाल्याने, द्राक्ष पिकास विशेष दर्जा मिळाल्यामुळे दूर होईल. बॅंका विनासायास ह्या क्षेत्रास पतपुरवठा करतील. पर्यायाने द्राक्षशेती वाढेल. बॅंकाचा पतपुरवठा वाढेल, कर्जात वाढ होईल, यावरील टॅक्‍स सरकारला मिळेल. बॅंकांना व्याज उत्पन्नातून वा अनुषंगिक उत्पन्नातून मिळणारे उत्पन्न वाढल्याने बॅंकाची स्थिती चांगली होण्यास मदत होईल. बॅंकांचा नफा वाढेल व सरकारला जो लाभांश मिळतो त्याच्यातही वाढ होईल. 

 पॉलिहाऊस शेतीमध्ये जसे सरकार भरपूर अनुदान देते तसे द्राक्षशेतीमध्ये संरक्षित लागवड क्षेत्र वाढू शकेल. संरक्षित लागवड क्षेत्रामुळे द्राक्ष पिकातून निश्‍चित असे उत्पादन प्राप्त होऊ शकेल. याचा खर्च जास्त असल्याने सरकारने यास वेगवेगळया पद्धतीने आधार दिल्यास जो दीर्घ मुदती तगाई स्वरूपात वा अनुदान स्वरूपी असल्यास द्राक्ष बागायतदार या शेतीकडे आकर्षित होतील. पॉलिहाऊस शेतीसारखी ह्यात वाढ होईल. द्राक्ष शेतीस हवामान बदलांमुळे जे नुकसान होते त्यास आळा बसून उत्पन्नाची खात्री येईल पर्यायाने या पिकास स्थैर्य प्राप्त होईल. 

 द्राक्षशेती ही भांडवली शेती आहे. जसा खर्च जास्त तसे नुकसानदेखील जास्त. या शिवाय वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षशेती म्हणजे नुकसानीची शेती असे वातावरण निर्माण झाले आहे. द्राक्ष शेती संरक्षित झाल्यास तिला विशेष दर्जा मिळाल्यास सरकारचे पाठबळ मिळेल. पर्यायाने विमाकंपन्या ह्या उद्योगाकडे आकर्षित होऊन द्राक्षास विम्याचे संरक्षण मिळेल. 

 द्राक्ष शेतीस स्थैर्य प्राप्त झाले आणि त्यामुळे सरकारच्या उत्पन्नातही वाढ झाली, तर सरकार ह्या शेतीवर वेगळ्या प्रकारचा कर आकारणी करून तो द्राक्ष बागायतदारांकडून वसूल करू शकते. 

अशाप्रकारे शेतकऱ्यांचे पर्यायाने सरकारचे जर उत्पनाशी निगडित फायदे होऊ शकत असतील, तर निश्‍चितच द्राक्षास विशेष दर्जा मिळणे गरजेचे ठरते व हे करण्यासाठी चहा बोर्ड, नारळ बोर्ड, कॉफी बोर्ड आदींच्या धर्तीवर द्राक्ष बोर्ड स्थापन व्हावे. राज्यामध्ये सर्व द्राक्ष बागायतदारांपर्यंत पोचलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाशी समन्वय साधून द्राक्ष बोर्डाची स्थापना झाल्यास द्राक्ष उत्पादकांचे प्रश्‍न, अडचणी यांचे निराकरण होऊन द्राक्षशेतीस स्थैर्य प्राप्त होईल. द्राक्ष शेती हा स्थिर स्वरूपाचा कृषी उद्योग होऊ शकेल. द्राक्ष उद्योगातील बागायतदारांबरोबरच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घटकांना व सरकारलादेखील एक निश्‍चित स्वरूपाचा उत्पन्न देणारा उद्योग होऊ शकेल, अशी मला आशा वाटते. 

कृषिरत्न अनिल मेहेर ः ९९७०१९६२६०
(लेखक ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगावचे चेअरमन आहेत.)



इतर संपादकीय
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
गोड बोलण्यासारखी स्थिती नाही!गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’...