agriculture news in marathi agrowon special article on use of artificial intelligence in agriculture | Agrowon

वेध भविष्यातील शेतीचा

विजय सुकळकर
गुरुवार, 16 जानेवारी 2020

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबतचा अभ्यासक्रम हा शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि वास्तवदर्शी असायला हवा.
 

आपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. तर काही शेतकरी शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानात उच्चमूल्य असलेल्या पिकांची निवड करून संरक्षित शेतीत (ग्रीन हाउस, पॉलिहाउस) पिकांचे नियोजन अगदी काटेकोरपणे केले जाते. अशी शेती करणारे शेतकरी फारच कमी आहेत. यातून पिकांची उत्पादकता आणि दर्जाही वाढला आहे. परंतु ही शेतीसुद्धा बदलत्या शेती परिस्थितीत आणि हवामान बदलाच्या काळात अडचणीची ठरत आहे. पारंपरिक तसेच आधुनिक शेतीत मनुष्यबळाची कमतरता प्रचंड जाणवतेय. तापमान, थंडी, पाऊसमान यात होत असलेले चढउतारात संरक्षित तसेच काटेकोर शेतीचे सुद्धा नुकसान वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीत उद्‍भवत असलेली नवनवी आव्हाने पेलण्यासाठी सध्यातरी शेतकरी आणि संशोधक यांच्या हाती काही नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सध्याच्या आणि भविष्यात उद्‍भवू पाहणाऱ्या शेती समस्यांवर मात करता येऊ शकते. खरे तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना जगात १९६० च्या दशकातच पुढे आलेली आहे. यामध्ये संगणक तसेच मशिनमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती भरून, तसेच त्या माहितीच्या पॅटर्नद्वारे त्यांच्याकडून मनुष्याप्रमाणे काम करून घेतली जातात. जागतिक पातळीवर उद्योग तसेच आरोग्य क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीपणे होत आहे. जगभरातील शेतीतही एक दशकापासून हे तंत्र वापरले जाते. आपल्या राज्यामध्ये मात्र आता उशिराने का होईना शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर आधारित अभ्यासक्रम कृषी विद्यापीठांत सुरू होत आहेत, ही बाब स्वागतार्हच म्हणावी लागेल.   

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे हवामान अद्ययावत शेती-पाणी व्यवस्थापन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे शेतीत ड्रोन आणि रोबोटिक तंत्राचा वापर, तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ऊर्जा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा मनुष्यबळ विकासाचे धडे विद्यार्थ्यांना खास पदविका अभ्यासक्रमाद्वारे दिले जाणार आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेचा हा प्रकल्प असून, त्यास जागतिक बॅंकेचे अर्थसाह्य लाभले आहे. सध्या याबाबतचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. हे अभ्यासक्रम पुढील वर्षी सुरू होणार असून, यातून मुले बाहेर पडण्यास अजून किमान दोन वर्षे लागतील. कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षित-प्रशिक्षित मुले बाहेर पडल्यावर आपल्या येथील शेतीच्या गरजा वेगळ्या, समस्याही वेगळ्या आणि प्रत्यक्ष शिक्षण वेगळे असे होता कामा नये. त्यामुळेच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबतचा अभ्यासक्रम हा शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि वास्तवदर्शी असायला हवा.

कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये शेती तंत्राबरोबर अभियांत्रिकी उपयोजनांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे अभ्यासक्रमात कृषी आणि अभियांत्रिकी या दोन्ही क्षेत्राचा योग्य समन्वय साधायला हवा. मुळातच उशिरा प्रशिक्षित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील विद्यार्थ्यांनी हे तंत्र शेतीत वापरासाठी मात्र झपाट्याने प्रसार करायला हवा. सोबतच याबाबतचे नवीन मनुष्यबळ विकासाचे कामही चालू ठेवावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने शेतीत लागणारी यंत्रसामग्री (ड्रोन, रोबोट, संगणक) ही महागडी असल्याने ती पुरविण्याचे काम शासनाने करायला हवे. अन्यथा, शेतीच्या यांत्रिकीकरणासारखे होईल. राज्याच्या शेतीचे यांत्रिकीकरण तर मोठ्या प्रमाणात झाले; परंतु त्याचे अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. तसे कृत्रिम बुद्धिमत्तेचे होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे ड्रोनच्या साह्याने कीडनाशके फवारता येतील. परंतु फवारणीसाठी घेतलेले कीडनाशक उत्तम गुणवत्तेचे नसेल तर उपयोग होणार नाही. याचा अर्थ कृत्रिम बुद्धिमत्तेने सारेच आलबेल होईल, असे नाही तर त्यास नैसर्गिक चांगुलपणाची साथही हवी, हेही लक्षात घ्यावे लागेल.


इतर संपादकीय
वन्यप्राण्यांचा वाढता तापअकोला जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील एका...
पीकविम्यातील बदलांचा लाभ कुणाला?‘ऐच्छिक’ घात  देशभरात एकूण शेतकऱ्यांपैकी ५८...
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
मराठी भाषेला जिवंत ठेवणारा शेतकरीआज मराठी राजभाषा दिन. महाराष्ट्राची मातृभाषा...
दरवाढीसाठी हवी तर्कसंगत चौकटबीटी कापूस बियाणे उत्पादन खर्च वाढल्यामुळे दरात...
मातीचं सोनं करणारे भवरलाल जैन...“बळीवंत आम्ही, मातीतला दास धरलेली कास, मरणाची”...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...
ग्रामीण विकासाचा ‘पर्यटन’ मार्गगेल्या आठवड्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात...