agriculture news in marathi agrowon special article on use of social media in banking | Agrowon

सोशल मीडिया आणि बॅंकिंग

प्रा. कृ. ल. फाले
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित ग्लोबल डिजिटल रिपोर्टनुसार, भारतात मे २०१८ अखेर ४१ टक्के लोकसंख्या म्हणजे ५५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याचे आढळते. त्यापैकी ३१ कोटी लोक सोशल मीडियावर कार्यरत होते. जून २०१८ मध्ये गुगलद्वारे प्रकाशित आकडेवारीनुसार, भारतात दर महिन्याला एक कोटी नवीन ग्राहक इंटरनेटशी जोडले जातात. 
 

जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती प्राप्त करण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करीत आहेत. व्यक्तिगत स्तरावर तर त्याचा वापर होत आहे. शिवाय, व्यावसायिक स्तरावरही आपल्या ज्ञानाचा विशेष क्षेत्रात विस्तार करण्यासाठी तसेच अन्य व्यावसायिकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठीही याचा वापर केला जातोय. उद्योग तसेच कॉर्पोरेट जगतातही ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याचा वापर होतो आहे. मागील १० वर्षांत सोशल मीडिया क्षेत्राने फार मोठी प्रगती केली आहे. फेसबुकबरोबरच यू ट्यूब, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हाट्सॲप इत्यादी यशस्वी उपक्रम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. जुलै २०१९ मध्ये प्रकाशित ग्लोबल डिजिटल रिपोर्टनुसार, जुलै २०१९ अखेर जगातील ५६ टक्के लोकसंख्या म्हणजे ४३३ कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत. यातील ८२ टक्के हिस्सा अर्थात ३५३ कोटी लोक सोशल मीडियाच्या संपर्कात असतात. आज पंतप्रधान यांचा जनतेला संदेश असो किंवा विविध कंपन्यांची धोरणे किंवा त्यातील बदल असो, प्रिंट अथवा इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन पोचतात. असंख्य कंपन्या आपल्या नवीन मालाचे उत्पादन सोशल मीडियावर प्रसिद्ध करून आपल्या ब्रँडची ओळख करून देतात. बॅंकांनाही आता असे वाटू लागले आहे, की बॅंकिंग व्यवसाय विस्तारासाठी सोशल मीडिया एक उपयुक्त माध्यम ठरू शकेल.

वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित ग्लोबल डिजिटल रिपोर्टनुसार, भारतात मे २०१८ अखेर ४१ टक्के लोकसंख्या म्हणजे ५५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याचे आढळते. त्यापैकी ३१ कोटी लोक सोशल मीडियावर कार्यरत होते. जून २०१८ मध्ये गुगलद्वारे प्रकाशित आकडेवारीनुसार, भारतात दर महिन्याला एक कोटी नवीन ग्राहक इंटरनेटशी जोडले जातात. सरकारसुद्धा डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहेत. डिजिटल मीडियाच्या निर्माणासोबतच मोबाईल बॅंकिंग, इंटरनेट बॅंकिंग, यूपीआय, सोशल मीडिया बॅंकिंगच्या कक्षा विस्तारत आहेत. भारताची अर्धी लोकसंख्या युवावर्गाची आहे आणि तांत्रिक बाबतीत पूर्वीपेक्षा हा वर्ग अधिक जाणता आहे. बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर ग्राहकसेवा, लेखा आणि माहिती तंत्रज्ञान यात अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी भारतीय बॅंकिंग क्षेत्रात संगणकीकरणाची आवश्‍यकता निर्माण झाली. १९९८ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली बॅंकांच्या संगणकीकरणासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. सन १९९१-९२ मध्ये आर्थिक सुधारणानंतर खासगी आणि विदेशी बॅंकांमधील वाढत्या प्रतिस्पर्धेमुळे संगणकीकरणाची आवश्‍यकता निर्माण झाली. व्यापारी बॅंकांच्या शर्यतीत टिकाव धरण्यासाठी डिजिटल ग्राहक सेवाप्रती बॅंका अधिक जागृत झाल्यात. ई-बॅंकिंगमध्ये सोशल मीडियाच्या वापरामुळे बॅंकांचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ झाली. 

बॅंकिंग क्षेत्रात सोशल मीडियाचा उपयोग 
ग्राहकांप्रती संबंध प्रस्थापित करणे 

युवावर्ग मोबाईल, लॅपटॉपद्वारे बॅंकसेवा मिळावी, अशी अपेक्षा करतो. बॅंकेत नवीन खाते उघडणे, बॅंकिंग सेवांची माहिती कोणत्याही शाखेत न जाता आपले मित्र किंवा परिचितांचा सल्ला घेऊन मिळवितो. या सेवेसाठी त्याला सोशल मीडियाचा वापर करून माहिती मिळविणे सोईचे ठरते. मार्केटिंग, सेल्स आणि ग्राहकसेवांबाबत जुनी पारंपरिक पद्धती कालबाह्य होत असून, सोशल मीडियाशी जोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील ३७०० महत्त्वपूर्ण मार्केटर्सच्या एका पाहणीनुसार ९२ टक्के मार्केटर्सनी सांगितले की, व्यापारवृद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करणे आम्हास फायदेशीर ठरले आहे. 

उपभोक्ता शिक्षण 
सोशल मीडिया सूचना प्रसारणासाठी एक जलद, माफक आणि आदान-प्रदान करण्यासाठी उपयुक्त मंच आहे. याद्वारे बॅंक, बॅंकिंग संबंधित प्राथमिक माहिती, बॅंकिंग नियम, केवायसी, नवीन उत्पादने, क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर, बनावट नोटांची ओळख, इंटरनेट/मोबाईल बॅंकिंग, पासवर्ड आणि पीन नंबर इत्यादी सूचनांसंबंधी गोपनीयता कळत असल्याचा सुरक्षिततेचा अनुभव मिळतो. 

ग्राहकांसंबंधी माहिती 
बॅंकांशी जुळलेला ग्राहक आणि संभाव्य ग्राहक, यांची माहिती जाणून घेण्याचे सोशल मीडिया एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बॅंकांना आवश्‍यक आणि उपयुक्त अशी ग्राहकांची माहिती सोशल मीडियाद्वारे प्राप्त करता येऊ शकते.

नवीन ग्राहक मिळविणे 
बॅंकांकडून असलेल्या ग्राहकांच्या अपेक्षा व तद्‌नुसार बॅंकांना नवनवीन योजना, ब्रँड यामध्ये बदल करून अधिक आकर्षक अशी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविणे सोशल मीडियाद्वारे शक्‍य होते. त्यामुळे ग्राहकांशी परिचित, मित्र तसेच असंख्य लोकांपर्यंत माहिती गेल्याने बॅंकांकडे नवीन ग्राहक आकर्षित होतात. 

शक्‍यता आणि विक्रीवृद्धी 
व्यवसायवृद्धीसाठी सोशल नेटवर्क उपयुक्त साधन ठरत आहे. फेसबुकही असेच एक उपयुक्त साधन आहे. जाहिरात आकर्षक पद्धतीने करण्यासाठी डिझाइन, लोगो यांचा आकर्षक वापर करून ग्राहकांवर त्याचा प्रभाव पाडणे हे विक्रीवृद्धीसाठी उपयुक्त ठरते.

अंतर्गत संवाद 
बॅंकांमधील अंतर्गत घटक उदा. ः अधिकारी, कर्मचारी यांच्याशी वेळोवेळी संवाद साधणे, उद्दिष्टांचा आढावा धेणे, कामाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे जाणून घेणे, ग्राहकांनी दिलेल्या सूचनांची माहिती वरिष्ठांपर्यंत पोचविणे, सेवेत काही त्रुटी असल्यास ते लक्षात आणून देणे आदी कामांचा आढावा सोशल मीडियावर घेता येतो.  सोशल मीडिया, फेसबुक, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारखी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे आज प्रभावी ठरत आहेत. त्याचा उपयोग लोककल्याणासाठी प्रभावीपणे होऊ शकतो याची जाणीव ठेवून बॅंकांनी आपल्या कार्याप्रती अग्रेसर असावे.    
 

प्रा. कृ. ल. फाले ः ९८२२४६४०६४
(लेखक राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्थेचे संचालक आहेत.)


इतर संपादकीय
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...
ग्रामीण विकासाचा ‘पर्यटन’ मार्गगेल्या आठवड्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात...
संशोधनासाठीसुद्धा आता हवा जनरेटामागील वर्षी स्पेनमधील माद्रिद येथे संयुक्त...
आता वाढवा कामाचा वेगमहाविकास आघाडी सरकारने राज्यातील सरकारी अधिकारी-...
वृक्षसंवर्धनासाठी अनोखे संमेलनअमेरिकेमधील टेक्सास प्रांतात मी एक उद्यान पहावयास...
क्रियेवीण वाचाळता व्यर्थचभारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या माध्यमातून...
शिवार जलयुक्त झाले, तर वॉटर ग्रीड...जलयुक्त शिवार, झाडे लावा या दोन्ही योजना पूर्वी...
‘एनएचबी’तील गोंधळम हाराष्ट्र राज्य फळे-फुले-भाजीपाला लागवड आणि...
तंत्रज्ञान स्वातंत्र्यास आग्रही...शरद जोशी यांना ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात जे...
अति‘रिक्त’ कृषी विद्यापीठेपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
निर्यातबंदीने कोंडी मागील उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि पावसाळ्यातील...
‘ब्लू इकॉनॉमी’चे वास्तवबदलत्या हवामानकाळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीवर...
घातक ‘टोळ’चे हवे जैविक नियंत्रण आं तरराष्ट्रीयस्तरावर टोळधाडीचे निरीक्षण व होणारे...