agriculture news in marathi agrowon special article on vegan milk in India | Page 2 ||| Agrowon

वेगान दूध -  गाईम्हशींच्या दुधाची जागा घेईल? 

डॉ. व्यंकटराव घोरपडे  
मंगळवार, 1 जून 2021

आज जागतिक दुग्ध दिवस आहे. अशा या दिवसाच्या पूर्वसंध्येला ‘पेटा’ने ‘अमूल’ला पत्र लिहून सध्याचे दूध उत्पादन संकलन बंद करून वेगान दूध उत्पादनाकडे वळावे, असा अनाहूत सल्ला दिला आहे. देशातील करोडो लोकांचा उदरनिर्वाह हा दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे, त्यालाच अपशकून करण्याचा हा प्रयत्न आहे. 

‘वेगान’ हा शब्दच मुळात व्हेजिटेरियन (Vegetarian) या शब्दातील प्रथम तीन आणि शेवटचे दोन शब्द एकत्र करून Vegan असा बनवला आहे. तो आता जगात वेगळ्या संदर्भाने पसरत चालला आहे. जे लोक मटण, चिकन, अंडी, चीज, दुधापासून बनवलेले ताक दही म्हणजे थोडक्यात प्राणी आणि प्राण्यापासून उत्पादित अगदी मध, कपडे, मोती न वापरणारी, खाणारी ही जगातील मंडळी एकत्र येऊन ही चळवळ उभी केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने चित्रविचित्र आंदोलने करून लक्ष वेधून घेणाऱ्या 'पेटा' (People for the ethical treatment of animals) सारख्या संस्थांच्या मदतीने जगातील विकसनशील देशात नवनवीन मुद्दे रेटण्याचा प्रयत्न करत असतात. 

आज जागतिक दुग्ध दिवस आहे. प्रत्येकाला दूध आणि दुधाविषयी माहिती व्हावी, त्यांनी ती जाणून घ्यावी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न आणि कृषी संघटने’च्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. आपण देशात 'शाश्वत दुग्ध व्यवसाय' या थीमवर हा दिवस साजरा करत आहोत. तसेही जगात आपण दुग्धोत्पादनात पहिले आहोत. आणि प्रतिमानशी प्रतिदिन दुधाचा वापर देखील तीनशे ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. हे सर्व वाढावं, पशुरोग निर्मूलनाच्या माध्यमातून जगात दुग्धजन्य उत्पादनाची निर्यात वाढावी, लोकांच्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्याविषयी जागृती व्हावी आणि एकूणच देशातील करोडो कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे हे अधोरेखित व्हावं, तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वापरावरून या मंडळींना आपण थेट मदत करू शकतो ही भावना वाढीस लागावी, असा व्यापक हेतू हा दिवस साजरा करण्यामागे निश्चितच आहे. अशा या दिवसाच्या पूर्वसंध्येला ‘पेटा’ या जागतिक संघटनेच्या भारतातील शाखेने देशातील अग्रगण्य अशी मोठी सहकारी दूध संस्था ‘अमूल’ला पत्र लिहून सध्याचे दूध उत्पादन संकलन बंद करून वेगान दूध उत्पादनाकडे वळावे. या 'वेगान' व्यवसायात पदार्पण करून त्याचा लाभ घ्यावा, असा अनाहूत सल्ला या पत्राद्वारे दिला आहे. आपण सर्वजाण जाणतोच की अमूल ही संस्था देशातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि वितरणातील एक अग्रगण्य सहकारी संस्था आहे. देशातील अनेक संस्था या संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतात. 

वेगान दूध - शाकाहारी दूध जे बदाम, सोयाबीन, नारळ आणि आता ओठ या पासून बनवले जाते. जे कोणत्याही बाजूने गाई म्हशीच्या दुधाची बरोबरी करू शकत नाही. त्यापासून मिळणारी ऊर्जा, शक्ती, शर्करा, फॅट, प्रोटीन, (प्रथिने) जीवनसत्त्वे यांची असणारी कमतरता वेगवेगळ्या मार्गाने त्यामध्ये समाविष्ट करून त्याला उच्च दर्जा देण्याचा प्रयत्न केला जातो. जो ‘डब्ल्यूएचओ’ला मान्य आहे, त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ते तयार केले जाते. याबाबत श्री. सोधी, व्यवस्थापकीय संचालक, अमूल यांनी याला उत्तर देताना वेगान दूध - दुधासारखे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू या रासायनिक किंवा कृत्रिमरीत्या तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त आपण 'पेय' म्हणू शकतो ते कोणत्याही परिस्थितीत दुधाचा दर्जा घेऊ शकत नाहीत. या प्रकारे उत्तर ट्विटरवर दिले आहे. पण पेटा वेगवेगळ्या प्राणिजन्य आजारांची यादी, पर्यावरणाबद्दल चिंता आणि प्राण्यांच्या बाबतीत क्रौर्य रोखणे असे मुद्दे समोर आणून आपला मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. 

एकूणच या देशातील करोडो लोकांचा उदरनिर्वाह हा या दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे, त्यालाच अपशकून करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दही, ताक, लोणी यांचा पूर्वापार समावेश आहे. आयुर्वेदात दुधाचा वापर हा विविध अंगांनी अधोरेखित केला आहे. शेवटी लोकांनी काय खावं आणि काय खावू नये, याबाबत निश्चितच जबरदस्ती करता येणार नाही, हे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या युरोपियन मंडळींना माहीत नाही असे नाही. असे असले तरीही जगातील मोठमोठ्या कंपन्या आपले उत्पादन खपवण्यासाठी सुद्धा असे उद्योग करत असतात. मागील ७५ वर्षांपासून या देशातील दुग्ध व्यवसाय करोडो लोकांचा आधारस्तंभ बनला आहे. अशा सर्व बाबी श्री. सोधी यांनी या पत्रानंतर ट्विटरच्या माध्यमातून सर्वांच्या नजरेसमोर आणल्या आहेत. 

जागतिक पातळीवर आपण दुग्धव्यवसायात प्रथम क्रमांकावर असलो तरी आपल्या पशुधन संख्येवरून आपल्याला टार्गेट केले जाते. या अशा प्रचंड पशुधनामुळे आणि त्यांच्या मिथेन वायू उत्सर्जनामुळे आपण पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत, असा आरोप करून नवनवीन बाबी आपल्यावर लादण्याचा जागतिक समुदायाचा प्रयत्न नेहमी सुरू असतो. आपल्याला येणाऱ्या काळात प्रति जनावर दूध उत्पादन वाढीसाठी प्रचंड प्रयत्न आणि मेहनत करावी लागेल हे निश्चित! त्याचबरोबर बदाम, सोयाबीन आणि नारळ यापासून सुद्धा नवनवीन मूल्यवर्धित उत्पादने घ्यायला पाहिजेत. या सर्वांचे भारतातील उत्पादनदेखील चांगले आहे. नैसर्गिक दुधापेक्षा त्यांच्या किमतीही जास्त आहेत. त्याचाही फायदा त्या त्या उत्पादकांना भविष्यात होऊ शकतो. एका आकडेवारीवरून आपल्या देशात देखील लॅक्टोज इनटॉलेरेंस (Lactose intolerance) असणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. वेगान खाद्य संस्कृती परदेशात वेगाने वाढत आहे. आपण मंडळी सर्वांगीण विचार न करता पाश्चात्त्यांचे अनुकरण करत असल्याने या सर्वांचा विचार आपल्याला या जागतिक दुग्ध दिनी करावाच लागेल. एकूणच पेटाचे अमूल साठी लिहिलेले पत्र आणि त्यावरील श्री. सोधी यांच्या प्रतिक्रिया या थेट दुधाशी संबंधित असल्यामुळे या घटनेचा धांडोळा माध्यमांमधून घेऊन वस्तुस्थिती आपल्या उत्पादकांना कळावी, यासाठीचा हा छोटासा प्रयत्न! 

डॉ. व्यंकटराव घोरपडे 
९३२५२२७०३३ 

(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.) 
 


इतर संपादकीय
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...
स्वतंत्र सिंचन यंत्रणेची करा निर्मितीपंतप्रधान कृषी सिंचन योजना देशातील अनेक राज्यांत...
घटता सहभाग चिंता वाढविणारापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी...
अनुदानात अडकले सूक्ष्म सिंचनाचे थेंब ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात...
हिरव्या ऋतूत पाण्याची वानवायावर्षी देशपातळीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या...
तीन दशके आर्थिक उदारीकरणाची!वामनाने तीन पावलांत बळीराजाला पाताळात ...
शांतता, संसदेत गोंधळ सुरू आहे!अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याने...
एफआरपी ः दूधदरावर कायमस्वरूपी तोडगाखरे तर मागील दशकभरापासून राज्यातील दुग्ध व्यवसाय...
अडचणीत वाढ अन् लुटीला प्रोत्साहनआधीच शेतकऱ्यांवर प्रचंड निर्बंध लादलेले असताना...
अवजारांची उपयुक्तता अन् दर्जा कसून...मागील दीड-दोन दशकांमध्ये देशात, राज्यात...
असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाहीगणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून...
आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचेकोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा...
जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढामागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या...