agriculture news in Marathi, agrowon, State-level kharif review Meeting in Mumbai on 2 May | Agrowon

राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी मुंबईत बैठक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी २ मे २०१८ चा मुहूर्त निवडला आहे. बुधवारी (ता. २) राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रंगशारदा सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे. 

मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी २ मे २०१८ चा मुहूर्त निवडला आहे. बुधवारी (ता. २) राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रंगशारदा सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे. 

हवामान विभागाने यंदाच्या वर्षी देशभरात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खरिपाच्या तयारीत कुठेही कसूर ठेवायची नाही, असा चंग सरकारने बांधला आहे. बैठकीसाठी सुमारे चारशे मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. कृषी, सहकारसह विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांमधील कृषी समितीचे अध्यक्ष आदींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 

कृषी खात्याचे राज्यभरातील उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय सहकार विभागाचे उच्चपदस्थही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नाबार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच इतर बँकांचे पदाधिकारीही बैठकीला येतील. खरिपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस स्वतः यंत्रणेला मार्गदर्शन करणार आहेत. कृषी खात्याला सरकारी यंत्रणेला प्रोत्साहित करण्याचे काम यावेळी केले जाणार आहे. शेतकऱ्यांना विशेषतः खते, बी-बियाणे पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर पुरवठा करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांना खरिपासाठी पतपुरवठा महत्त्वाचा असतो. यासंदर्भातही धोरण निश्चित केले जाणार असल्याचे कृषी खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीचे आयोजन प्रत्येक वर्षी मंत्रालयाशेजारील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये केले जाते. यावेळी प्रतिष्ठानचे सभागृह इतर कार्यक्रमासाठी आगाऊ नोंदणी झालेले असल्याने बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...