agriculture news in Marathi, agrowon, Toilets from MNREGA for divided Families | Agrowon

विभक्त कुटुंबांसाठी मनरेगातून शौचालये ः बबनराव लोणीकर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई : राज्यातील ग्रामीण ३४ पैकी ३२ जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून, उर्वरित दोन जिल्हे येत्या आठवडाभरात हागणदारीमुक्त होऊन राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली जाईल. आधारभूत (बेसलाइन) सर्वेक्षणानुसार हे सर्व जिल्हे हागणदारीमुक्त होत असले तरी बेसलाइन सर्वेक्षणानंतर विभक्त झालेल्या कुटुंबांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शौचालये बांधण्याच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिले.

मुंबई : राज्यातील ग्रामीण ३४ पैकी ३२ जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून, उर्वरित दोन जिल्हे येत्या आठवडाभरात हागणदारीमुक्त होऊन राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली जाईल. आधारभूत (बेसलाइन) सर्वेक्षणानुसार हे सर्व जिल्हे हागणदारीमुक्त होत असले तरी बेसलाइन सर्वेक्षणानंतर विभक्त झालेल्या कुटुंबांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शौचालये बांधण्याच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिले.

या वेळी हागणदारीमुक्त झालेल्या नाशिक, बुलडाणा, परभणी, नंदुरबार, यवतमाळ, अहमदनगर व धुळे या सात जिल्ह्यांचा सत्कार सोहळा श्री. लोणीकर यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, नाशिक जि.प. अध्यक्ष शीतल सांगळे, बुलढाडाणा जि.प. अध्यक्ष उमाताई तायडे, नंदुरबार जि.प. अध्यक्ष रजनी नाईक, परभणीचे जि.प.चे पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सभापती अशोक काकडे आदी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करून श्री. लोणीकर यांनी, हे यश लोकप्रतिनिधी, सर्व सरपंच तसेच राज्यस्तरापासून ते गावपातळीपर्यंतचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी राबविण्यात आलेल्या निर्मल ग्राम मोहिमेत एकदा गाव निर्मल घोषित झाल्यानंतर स्वच्छतेबाबत त्या ठिकाणी सातत्य राहत नव्हते.

स्वच्छतेच्या कामात  महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी महान कार्य केले आहे. त्याचा आदर्श ठेवून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेसाठी लोकसहभागातून चळवळ राबविण्याचा निर्णय घेतल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

श्री. लोणीकर पुढे म्हणाले, की प्रारंभी स्वच्छ भारत अभियानमध्ये सर्व ग्रामीण व शहरी भागात हागणदारीमुक्तीसाठी शौचालयनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण देश २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्द‍िष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुदतीच्या दीड वर्षे आधीच आपले राज्य हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला. येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होत असल्याचे ते म्हणाले.

इतर बातम्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...