साताऱ्यात वांगी, टोमॅटोची आवक वाढली

वांगी
वांगी
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात वाटाणा, कोबीचे दर तेजीत होते. वांगी, टोमॅटो आवकेत वाढ झाली. पालेभाज्यात मेथी व कोथिंबीरीची आवक आणि दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 
बाजारसमितीत वाटाण्याची खटाव, माण, महाबळेश्वर तालुक्‍यातून आवक सुरू आहे. वाटण्याची गत सप्ताहात ४५ क्विंटल आवक झाली होती. वाटाण्यास ४५०० ते ६००० रुपये तर सरासरी ५००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची १८० क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला १००० ते ३००० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे. 
 
वांगी व टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. वांग्याची गतसप्ताहात ९० क्विंटल आवक झाली होती. वांग्यास १००० ते २५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये क्विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची ४५० क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ४०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे.
 
येथे रविवारी व गुरुवारी कांदा, बटाट्याची आवक होत आहे. कांद्याची ५२० क्विंटल आवक झाली. कांद्यास १३०० ते १८०० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची ९५० क्विंटल आवक झाली. बटाट्यास ४०० ते ७०० रुपये तर सरासरी ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे. कोबी, पालेभाज्यात
मेथीची दररोज १००० ते १५०० जुड्यांची आवक होत आहे. मेथीस शेकड्यास ८०० ते १००० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com