agriculture news in Marathi, agrowon, Veteran singer Arun Date passed away | Agrowon

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे निधन
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 मे 2018

मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे आज (रविवार) मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. दाते यांच्या निधनाने मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव सायन येथील स्मशानभूमीत दुपारी १२ ते ४ दरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे आज (रविवार) मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. दाते यांच्या निधनाने मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव सायन येथील स्मशानभूमीत दुपारी १२ ते ४ दरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली... अशा अजरामर भावगीतांनी मराठी श्रोत्यांच्या मनात अरुण दाते यांनी स्थान मिळविले होते. त्यांचा जन्म ४ मे १९३४ मध्ये इंदूर येथे झाला. वडील रामूभैया दाते हे इंदूरमधील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार धार येथे जाऊन अरुण दाते यांनी कुमार गंधर्व यांच्याकडे गाणे शिकायला सुरवात केली.

पुढे गाण्यात कारकीर्द करायला सुरवात केल्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली आणि हे गीत तुफान लोकप्रिय झाले. अशा एकाहून एक गीतांनी त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे. भातुकलीच्या खेळामधला राजा आणि राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात दाते यांचे मोलाचे योगदान आहे. दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

इतर बातम्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...