राज्यात आज पावसाचा अंदाज

साेमवार (ता. १८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १६० मिलीमीटर पावसाची नाेंद काेकणात कुडाळ येथे झाली. पुढील ४८ तासांत बुधवारपर्यंत (ता. २०) राज्यात काेकण गाेव्यात तुरळक ठिकाणी जाेरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यात आज पावसाचा अंदाज
राज्यात आज पावसाचा अंदाज

पुणे ः काेकण आणि गाेव्यात मंगळवारी (ता. १९) तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

पुढील ४८ तासांत बुधवारपर्यंत (ता. २०) राज्यात काेकण गाेव्यात तुरळक ठिकाणी जाेरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. साेमवार (ता. १८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १६० मिलीमीटर पावसाची नाेंद काेकणात कुडाळ येथे झाली. गेल्या २४ तासांत काेकण गाेव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जाेरदार पाऊस झाल्याची नाेंद आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नाेंद झाली आहे.

साेमवार (ता. १८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः काेकण ः कुडाळ १६०, मालवण १५०, कणकवली १४०, रत्नागिरी ११०, लांजा १००, सांगे ९०, माणगाव, पेडणे, वाल्पाेई प्रत्येकी ८०, चिपळूण, दाेभाेलीम, म्हापसा, राजापूर, सावंतवाडी प्रत्येकी ७०, देवगड दाेडामार्ग, मडगाव, वेंगुर्ला प्रत्येकी ६०, वैभववाडी ५०.

मध्य महाराष्ट्र ः पाराेळा ८०, गगनबावडा ७०, पाचाेरा ४०.

मराठवाडा ः पूर्णा ६०, भाेकरदन, गंगापूर, हदगाव, खुल्ताबाद, उमरी प्रत्येकी ५०.

विदर्भ ः आष्टी, पाैनी प्रत्येकी ८०, देऊळगावराजा ७०, काटाेल, सेलू सिंदखेडराजा, वर्धा प्रत्येकी ६०, चामाेर्शी, काेरची, वरुड प्रत्येकी ५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com