विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

उद्या (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावासाचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान
हवामान

पुणे ः विदर्भात आज (गुरुवारी)  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यात आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  राज्यातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाल्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. येत्या रविवार (ता. १७) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावासाचा अंदाज वर्तविला आहे.  बुधवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस  (मिलिमीटरमध्ये)  कोकण ः मुंबई १००, कर्जत ९०, खालापूर, माथेरान ७०, देवगड, पनवेल ६०, भिरा, मडगाव, पेण, सांगे, उरण, वाकवली ५०. मध्य महाराष्ट्र ः खटाव वडुज ९०, करमाळा ८०, माढा ७०, अंमळनेर, सुरगाणा ६०, दहीगाव, धरणगाव ५०, बारामती, कोल्हापूर, पाचोरा, पंढरपूर, शिरपूर ४०. मराठवाडा ः रेणापूर १६०, औरंगाबाद ८०, भूम, लातूर ७०, गेवराई ६०, अंबाजोगाई, केज, निलंगा, शिरूर कासार ५०, परंडा, परळीवैजनाथ, सिल्लोड ४०.   विदर्भ ः चिखली, जोईती ७०, भद्रावती, चिमूर, कोरपणा ६०, आष्टी, बल्लारपूर, बुलडाणा, मोहाडी, मूल, नरखेडे ५०, गोंदिया, राजुरा ४०. घाटमाथा ः शिरगाव ९०, भिरा, लोणावळा, दावडी, डुंगरवाडी, ताम्हिणी, धारावी ५०, लोणावळा ४०, अंबोणे, कोयना ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com