agriculture news in Marathi, agrowon, which farmer you wants to alive Pakistan or India or India | Agrowon

शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 मे 2018

नागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती करून भारतीय जवान आणि सामान्यांचे बळी घेत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना आयात केली असून, सरकारला देशातील शेतकऱ्यांना जगवायचे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. 
 

नागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती करून भारतीय जवान आणि सामान्यांचे बळी घेत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना आयात केली असून, सरकारला देशातील शेतकऱ्यांना जगवायचे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. 
 

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना नागपूरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, देशात विक्रमी उत्पादन झालेल्या अन्नधान्याची आयात केली जात आहे. साखरेनंतर आता तूरदाळ आयात करण्यात आली. त्यावरूनच शासनाला शेतकरी जगवायाचाच नाही, हे सिद्ध होते. शेतमालाची उत्पादकता वाढीचे आवाहन थेट पंतप्रधान करतात आणि शेतकरी उत्पादकता वाढ करतात तेव्हा भाव पाडले जातात, अशी विरोधी खेळी खेळली जात आहे. 

शासकीय खरेदीचे चुकाने दिले गेले नाही. आज आत्महत्या करणारे शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठ्या लिहित आहेत. सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीद्वारे सांगत आहेत. हे एकप्रकारचे भाजप-शिवसेना सरकारचे अपयश असल्याचेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. 

नागपूरात पावसाळी अधिवेशन होत असल्याबाबत विचारणा केली असता, अधिवेशन कुठे घ्यावे हा सरकारचा अधिकार आहे. त्याला आपला पाठिंबा राहील. सरकारला जाब विचारण्याचे काम आमचे आहे, ते आम्ही करूच, असेही अजित पवार म्हणाले. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...