रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे ग्राहकांची पाठ

धान्यमहोत्सवाकडे  ग्राहकांनी पाठ फिरवली होती
धान्यमहोत्सवाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती

नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असतानाच याच रणरणत्या उन्हात सेंद्रिय धान्यमहोत्सव घेत नव्या विक्रमाची नोंद नागपूरच्या आत्मा यंत्रणेने आपल्या नावे केली आहे. मात्र, हा धान्यमहोत्सव केवळ औपचारिकताच ठरला असून, ग्राहकांनी पाठ फिरविल्याने सहभागी शेतकऱ्यांचादेखील हिरमोड झाला आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून देण्याच्या प्रयत्नातून राज्यात सर्वदूर धान्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद््घाटन आणि त्याच जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या उपस्थितीत समारोप असा प्रोटोकॉल या महोत्सवाकरिता निश्‍चित करून प्रत्येकी सुमारे १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतकरीहिताऐवजी भाजपचे ब्रँडिंग करण्याचा उद्देश साधण्यावरच या महोत्सवातून भर दिला गेला. त्याच्या परिणामी अकोला आणि नागपूर येथे हे महोत्सव अपयशी ठरले. 

अकोला येथे २८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत महोत्सव घेतला गेला. या महिन्यात उन्हाचा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे असतो. त्यामुळे ग्राहकांनी या महोत्सवाकडे पाठ फिरविली. अकोल्याचे आमदार रणधीर सावरकार यांनी आत्मा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेवर त्या वेळी चांगलीच टीका केली. दरम्यान, या संदर्भाने प्रतिक्रियेसाठी कृषी सचिव विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा मोबाईल बंद होता. 

अनुभवातून शहाणपण नाहीच अकोल्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्राहक धान्यमहोत्सवात फिरकलेच नाहीत. या अनुभवातून शहाणे होणे नागपूर आत्माच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित होते; परंतु तसे न होता नागपूर आत्माकडून २१ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत धान्यमहोत्सव भरविण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या नागपूर प्रक्षेत्रावरील एका शेतात साधा मंडप टाकून त्यात स्टॉल लावण्यात आले. इतर कोणत्याच सुविधा या ठिकाणी नसल्याने ग्राहकांनी या महोत्सवाकडे पाठ फिरविली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com