agriculture news in marathi, Ahead of interim budget, Halwa ceremony held at Finance Ministry | Agrowon

हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची छपाई सुरू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागतात. अजून दहा दिवसांनी म्हणजे एक फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. परंपरागत हलवा बनविण्याच्या कार्यक्रमानंतर सोमवारी (ता. २१) अर्थसंकल्पासंबंधित कागदपत्रांच्या छपाईला सुरवात झाली. 

नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागतात. अजून दहा दिवसांनी म्हणजे एक फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. परंपरागत हलवा बनविण्याच्या कार्यक्रमानंतर सोमवारी (ता. २१) अर्थसंकल्पासंबंधित कागदपत्रांच्या छपाईला सुरवात झाली. 

   अर्थमंत्री अरुण जेटली हे उपचारासाठी अमेरिकेत असल्याने यंदा प्रथमच ते हलवा कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्‍ला, अर्थ विभागाचे सचिव सुभाष गर्ग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अर्थसंकल्पाच्या छपाईसाठी मंत्रालयातील १०० अधिकारी व कर्मचारी आता पुढील दहा दिवस अर्थ मंत्रालयातील छपाई कारखान्यात बंदिस्त राहणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा लेखानुदान मांडण्यात येणार आहे.

हलवा बनविण्याची प्रथा

 •  अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम गोपनीय असते.
 •  हे किचकट काम हलके-फुलके करण्यासाठी हलवा कार्यक्रम
 •  १०० अधिकारी व कर्मचारी दहा दिवस बंदिस्त
 •  बाहेरच्या जगाशी संपर्क नाही.
 •  वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही घरी जाण्याची परवानगी नसते.

सुरक्षा व्यवस्था

 •  अर्थ मंत्रालयात कडेकोट बंदोबस्त
 •  बाहेरील कोणालाही प्रवेश नाही
 •  अनिवार्य असेल तरच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत आत प्रवेश
 • अर्थसंकल्प फुटू नये यासाठी...
 •  गुप्तचर विभागासह साईबर सुरक्षा विभागाचा पहारा
 •  मंत्रालयातील मोबाईल फोनची सेवा खंडित
 •  केवळ लॅंडलाइन फोनद्वारेच संपर्क

वैद्यकीय सेवा

 •  मंत्रालयात दहा दिवस डॉक्‍टरांचे पथक तैनात
 •  कर्मचारी आजारी पडल्यास तत्काळ सेवा उपलब्ध
 •  आजारी कर्मचाऱ्याला रुग्णालयात उपचारांवर निर्बंध

 इंटरनेट सेवा बंद

 •  ज्या संगणकांवर अर्थसंकल्पाची कागदपत्रे असतात त्यावरील इंटरनेट सेवा खंडित
 •  केवळ प्रिंटर व छपाई यंत्रांशीच 
 • संगणकांची जोडणी
 •  "एनआयसी'चे सर्व्हरची जोडणीही काढतात
 •  हॅकिंगची शक्‍यता राहत नाही
 •  छपाई कारखान्यात निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रवेश

इतर अॅग्रोमनी
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...