विद्यार्थ्यांसाठी अहिल्यादेवी यांचे कार्य प्रेरणादायी : सहकारमंत्री देशमुख

विद्यार्थ्यांसाठी अहिल्यादेवी यांचे कार्य प्रेरणादायी : सहकारमंत्री देशमुख
विद्यार्थ्यांसाठी अहिल्यादेवी यांचे कार्य प्रेरणादायी : सहकारमंत्री देशमुख

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठीही मदत मिळेल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. ६) येथे केले. 

मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर मंगळवारी (ता. ५) सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असा नामकरण सोहळा पार पडला. त्या वेळी सहकारमंत्री देशमुख बोलत होते. या प्रसंगी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नारायण पाटील, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.बी.घुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, गोपिचंद पडळकर, उत्तमराव जानकर, माजी महापौर अरुणा वाकसे आदी उपस्थित होते. 

धनगर समाजाच्या प्रश्‍नांसाठी सरकार गंभीर आहे. समाजाच्या एकीच्या चळवळीमुळे हे शक्‍य झाले, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले. 

जानकर म्हणाले, "भाजप सरकारने नामविस्ताराचे दिलेले आश्‍वासन निवडणुकीपूर्वी पूर्ण केले. लिंगायत समाजाच्याही मागण्या पूर्ण होतील. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी स्वतंत्र बजेट करण्याची सरकारकडे मागणी केली जाईल. राज्य सरकार धनगर समाजासोबत आहे.''

तत्कालीन महापौर अरुणा वाकसे यांनी प्रथम सोलापूर महापालिकेत नामविस्ताराचा ठराव पास केला.  त्यानंतर समाजबांधवांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळाले. दिरंगाई झाली, परंतु आश्‍वासन सरकारने पूर्ण केले. नामविस्तार म्हणजे महापुरुषांचा गौरव होय. समाजाने संघटितपणे लढा दिल्यास सर्व मागण्या पूर्ण होतील, असे शिंदे यांनी सांगितले. 

सहकारमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

सहकारमंत्री देशमुख आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचे सातत्याने अभिनंदन करत होते. मात्र, उपस्थित धनगर समाजाच्या तरुणांनी आरक्षणाचे बोला, अशी घोषणाबाजी केली. उपस्थितांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत त्यांचे भाषण रोखण्याचाही प्रयत्न केला. देशमुख यांनी सरकार आरक्षणाचीही मागणी पूर्ण करेल, असे सांगितले. पण उपस्थितांनी, खोटे बोलू नका, तुमच्याकडे मागणी करूनही नामविस्तार व आरक्षणासाठी तुम्ही पत्र दिले नाही, असे म्हणत घोषणाबाजी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com