नगर जिल्ह्यात प्रवास पाससाठी ‘हे’ नोडल अधिकारी जाहीर

नगर जिल्ह्यातून अथवा जिल्ह्यात मूळगावी जाण्यासाठीपदसिद्ध नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केली आहे.
नगर जिल्ह्यात प्रवास पाससाठी  ‘हे’ नोडल अधिकारी जाहीर
नगर जिल्ह्यात प्रवास पाससाठी ‘हे’ नोडल अधिकारी जाहीर

नगर : राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे नगर जिल्ह्यात व राज्यामधील इतर जिल्ह्यांमध्ये वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मूळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात पदसिद्ध नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील यांची तर जिल्ह्यातून बाहेरच्‍या जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मीला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

साथरोग अधिनियम 1897 अन्‍वये निर्गमित करण्‍यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतूदीनुसार व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 अन्‍वये कामकाज करण्‍यासाठी दोन पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये बाहेरून जाणाऱ्या-येणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी - नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील (मो.9763739974), सहाय्यक नोडल अधिकारी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे तहसीलदार महेश पवार ( मो. 8956799922), करमणूक कर शाखा नायब तहसीलदार सुनील पाखरे (मो. 9309881788) व पुनर्वसन शाखा अव्‍वल कारकून अमोल झोटींग (मो. 9922426717), कुळकायदा शाखा अव्‍वल कारकून शेखर साळूंके (मो.9881119866)आणि सं.गा.यो. शाखा लिपिक भगवान सानप (मो.9130836918) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.

लॉकडाऊन मुळे अहमदनगर जिल्ह्यातील इतर जिल्‍ह्यांमध्ये वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्‍यक्‍तींना अहमदनगर जिल्ह्यातील वास्‍तवांच्‍या मूळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दतीनुसार Annexure B भरुन घेऊन  कार्यवाही करण्‍यात येणार आहे.  तसेच जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या व्‍यक्‍तीची तालुकानिहाय यादी संबंधित तहसीलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक यांना कळविणे, अशी जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यातून बाहेरच्‍या जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मीला पाटील ( मो.9130799939), सहाय्यक नोडल अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील  (मो.7020739411), महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गीते (मो.9403709123), निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे (मो.9881304874) गृह शाखा नायब तहसीलदार राजू दिवाण (मो.9890929510) व निवडणूक शाखा अव्‍वल कारकून राजेंद्र शिंदे (मो. 7588543715), करमणूक कर  शाखा अव्‍वल कारकून  संदेश दिवटे (मो.7020945296) आणि ग्रामपंचायत शाखा लिपिक प्रवीण कांबळे (मो.7020360085) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.  

 यापूर्वीच्या आदेशात बदल करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (भूसंपादन क्रमांक 15 )अजय मोरे यांच्या ऐवजी पाटील तर जिल्ह्यातून बाहेरच्‍या जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी  नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी   जितेंद्र पाटील  यांच्या ऐवजी उपजिल्हाधिकारी ऊर्मीला पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com